Rupali Chakankar & Supriya Sule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Supriya Sule Politics: ‘प्रांजल खेवलकर प्रकरणात मोबाईल डेटा चाकणकरांकडे गेला कसा?’, सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न

Supriya Sule asks how Rupali Chakankar got Pranjal Khewalkar's mobile data: डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या पोलिसांकडील मोबाईलमधील माहिती जाहीर केल्याने रुपाली चाकणकर स्वतःच अडकल्या

Sampat Devgire

Pranjal Khewalkar Case: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या पती विषयी रूपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी याबाबत पोलिसांची कार्यपद्धती आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या उल्लंगणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रूपाली चाकणकर नव्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात पुणे पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे प्रकरण कथित रेव्ह पार्टीशी संबंधित आहे. मात्र सुरुवातीपासूनच या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा जोरदार प्रयत्न झाला.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांची संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आम्ही सार्वजनिक जीवनात अत्यंत पारदर्शक पद्धतीने कामकाज करतो. रोहिणी खडसे यांच्या पतीने सार्वजनिक जीवनात काही केले असेल तर त्याची जबाबदारी पक्ष म्हणून मी घेईल. मात्र कोणाच्याही व्यक्तिगत आणि दैनंदिन कामकाज जातील गोष्टींचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ शकत नाही.

एखाद्या व्यक्तीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल्यास त्याची जबाबदारी देखील पोलिसांवरच असते. मोबाईल मधील माहिती अथवा डेटा हे थेट न्यायालयालाच सादर केले जाते. अन्य कोणालाही ती माहिती देणे हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. संसद, सर्वोच्च न्यायालय आणि संविधानाशी हा विषय संबंधित आहे. ही माहिती अन्यत्र दिल्यास त्यात राईट टू प्रायव्हसी या नियमांचा स्पष्टपणे भंग होतो.

रूपाली चाकणकर यांनी डॉ खेवलकर यांच्या विषयी जाहीरपणे विविध विधाने केली आहे. डॉ ठेवलकर यांच्या मोबाईल मध्ये सापडलेल्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि अन्य माहिती बाबत त्यांनी जाहीरपणे गंभीर आरोप केले आहे. या आरोपांनी सणसणाटी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.

या प्रकरणातून पोलिसांकडे असलेल्या मोबाईल मधील माहिती कोणीतरी तिसरा व्यक्ती माध्यमांना देतो. त्यात उघड उघड व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले आहे. संसद, राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध निवडण्यात दिलेले निर्देश या संदर्भात आम्ही बोलतो आहोत.

रुपाली चाकणकर यांनी दिलेली माहिती विचाराात घेता, त्यात उघडपणे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःच कायदे तज्ञ आहेत. पाच ते सहा वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एकदा ते कायद्याच्या भाषेत प्रतिक्रिया देत असतात. आता ते याबाबत काय भूमिका घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पुन्हा दाखल करणार की नाही, हा आता त्यांचा प्रश्न आहे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT