Eknath Khadse accuses Rupali Chakankar of political conspiracy: पुणे येथील वादग्रस्त रेव्ह पार्टी आणि त्याबाबत पोलिसांची कारवाई हा आता राजकीय विषय होऊ लागला आहे. या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर रोज नव्हे खुलासे करीत आहेत. त्याला आता थेट एकनाथ खडसे यांनीच उत्तर दिले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे एका नव्या प्रकरणाने चर्चेत आले आहेत. माजी मंत्री खडसे यांचे जावई डॉ प्रांजल खेवलकर यांच्यावर पुणे येथे रेव्ह पार्टीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या चौकशी दरम्यान रोज नवी माहिती बाहेर येऊ लागली आहे.
डॉ खेवलकर यांच्या मोबाईल मध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केला. विविध १,७७९ आक्षेपार्ह व्हिडिओ यामध्ये आहेत. विविध फोटो आणि आक्षेपार्ह साहित्य असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ रूपाली चाकणकर यांनी माध्यमांना दिली.
महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी देश परदेशात सुरू आहे. याबाबत महिला आयोगाने गेल्या साडेतीन वर्षात मोठे काम केले आहे. ठेवलकर प्रकरणात साडेतीनशेहून अधिक महिलांचा गैरवापर झाला असे दिसते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीने माफी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणाला आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट उत्तर दिले आहे. मी रूपाली चाकणकर यांच्यासारखा गैरप्रकारांना पाठीशी घालणारा व्यक्ती नाही. ज्या मुलींवर अन्याय झाला असे सौ. चाकणकर यांचे म्हणणे आहे, त्याचा पुरावा देखील आवश्यक आहे. या प्रकरणात एकाही महिलेने तक्रार दिलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोणी तक्रार दिली असेल तर तसे रूपाली चाकणकर यांनी सांगावे, असे थेट आव्हान खडसे यांनी दिले.
सध्या तक्रार नसताना रूपाली चाकणकर रोज नवे आरोप करीत आहेत. हे प्रकार म्हणजे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला. चाकणकर यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो द्यावा.
मात्र मूळ विषय हा अमली पदार्थांच्या अनुषंगाने आहे. त्यावरून चाकणकर जाणीवपूर्वक लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चाकणकर यांना जर ही माहिती मिळत असेल तर मग गोपनीय माहिती बाहेर कशी जाते? त्याबाबत दुसरा गुन्हा का दाखल केला गेला नाही? असा गंभीर सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
एकंदरच अमली पदार्थांशी संबंधित पुण्यातील रेव्ह पार्टीचा संबंध डॉ खेवलकर यांच्याशी जोडण्यात आला आहे. मात्र त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यातील राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी त्याचा वापर होताना दिसतो. त्यामुळे हे प्रकरण आगामी काळात कोणत्या वळणावर पोहोचते याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.