NCP delegation
NCP delegation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP news; स्थगिती सरकारमुळेच गुजरातला जोडण्याची मागणी झाली

Sampat Devgire

नाशिक : कळवण-सुरगाणाचे (Kalwan) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांना राज्य सरकारने (Shinde Government) स्थगिती दिली आहे. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी (Trible) बांधवांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आहे. त्यातूनच सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या कार्यकर्त्यांनी गुजरातला (Gujrat) जोडा अशी मागणी केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार (Ravindra Pagar) यांनी केला. (Surgana issue is a Chintaman Gavit`s Persnal)

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती गावांमध्ये असुविधा आहे. त्यामुळे सुविधा द्या अन्यथा त्या गावांना गुजरातला जोडा अशी मागणी केली होती. त्यावरून खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात आज पक्षातर्फे खुलासा करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरगाणा तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी असंतोषापोटी गुजरातला जोडण्याची केलेली मागणी असंतोषापोटी व्यक्तीगत स्वरूपाची आहे, असे स्पष्टीकरण आज (ता.२) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिले.

श्री. पगार म्हणाले, की श्री. गावित यांनी सुरगाणा तालुक्यातील प्रश्‍नांबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सुरगाणा तालुक्यातील काही भागात विकास होत नसल्याने गुजरातला सीमावर्ती भाग जोडण्यात यावा, अशी भावनिक मागणी केली आहे. पण महाराष्ट्र एकसंध राहावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT