eknath shinde  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Eknath Shinde : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, थेट व्हिडीओ टाकत कुणी केला आरोप?

Akshay Sabale

Jalgaon News : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. महायुतीकडून किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सभा घेतली.

जळगावातील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांची सभा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी केला आहे. याचा व्हिडीओ सुषमा अंधारेंनी ट्विट केला आहे.

शनिवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी त्यासह संस्थाचालकांची आदित्य लोन येथे सभा आयोजित केली होती. किशोर दरांडेंच्या ( Kishor Darade ) प्रचारासाठी एकनाथ शिंदे आले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात असल्याचा व्हिडीओ सुषमा अंधारेंनी ट्विट केला. तसेच, कुठंय निवडणूक आयोग? असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला आहे.

ट्विटमध्ये काय अंधारे काय म्हणाल्या?

"महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठाय निवडणूक आयोग?" असा प्रश्न सुषमा अंधारेंनी ( Sushma Andhare ) विचारला आहे.

शिक्षक भावी पिढी घडवितात...

यावेळी शिक्षकांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ही निवडणूक शिक्षकांनी आहे. आई-वडील यांच्यानंतर शिक्षकांना स्थान आहे. शिक्षक आपली भावी पिढी घडवतात. शिक्षकांचे प्रश्न सोडवणं शासनाचं काम आहे. शाळांना सातव्या वेतन आयोगानुसार अनुदान मिळालं पाहिजे. आदिवासी शाळांच्या मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक आहे. शिक्षक राज्याचा प्रमुख कणा आहे. सरकारचं मत तयार करण्याचं काम शिक्षक करतात. किशोर दरांडेंनी कंत्राटी शिक्षक भरतीसह अनेक विषयांचा पाठपुरावा केला."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT