CM Eknath Shinde on Loksabha Election : 'लोकसभा निवडणुकीत आमच्या काही चुका झाल्या, विशेषतः..' ; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

Eknath Shinde admitted Lok Sabha elections mistakes : 'मात्र आता त्या पराभवाचा बदला...' असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
CM Shinde
CM ShindeSarkarnama

Eknath Shinde on Teachers Constituency Election News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी संस्थाचालकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उमेदवार किशोर दराडे यांना मदत करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आमचे सरकार प्राधान्याने काम करील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तसेच 'लोकसभा निवडणुकीत आमच्या काही चुका झाल्या. विशेषतः हेमंत गोडसे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळे पराभव झाला. त्या पराभवाचे उट्टऺ शिक्षक निवडणुकीत काढा.', असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची कबुलीच दिली. ते म्हणाले, 'कांदा निर्यात बंदीचा प्रश्न गंभीर होता. मात्र त्यावर अपेक्षित तोडगा काढता आला नाही. विरोधकांनी चुकीचे चित्र निर्माण केले. ते चित्र खोडून काढण्यात सत्ताधारी पक्ष कमी पडला.'

'उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांचा पराभव झाला. काही चुका आमच्याकडून झाल्या. शिवसेना शिंदे गट ठाकरे गटापेक्षा अधिक मते घेऊन पुढे राहिला आहे. मात्र आता त्या पराभवाचा बदला शिक्षक मतदार संघातील उमेदवाराच्या विजयाने घेऊ'.

CM Shinde
Sanjay Kute News : 'हिंगोलीत ऐनवेळी उमेदवार बदलल्याचाही महायुतीला फटका बसला' ; भाजपच्या संजय कुटेंची स्पष्ट कबुली!

शिक्षकांनी महायुतीच्या सरकार मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे शिक्षकांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे शिक्षक मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केले.

CM Shinde
Video Eknath Shinde : घासून नाही तर ठासून...शिवसेनेचे बालेकिल्ले आपण जिंकले! मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले

यावेळी विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दराडे यांना पाठिंबा दिला. विविध संस्थाचालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे(Dada Bhuse), उमेदवार किशोर दराडे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, श्रीकांत देशपांडे, माजी खासदार हेमंत गोडसे, प्रकाश लोंढे, भाऊसाहेब चौधरी यांचा विविध पदाधिकारी व्यासपीठावर होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com