CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ठाकरे गटातील नेत्याने थेट मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेल्या नाराज नेत्यांची यादीच वाचली

राज्यातील शिंदे सरकार लवकरच पडणार, असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने नियमीत करण्यात येतो.

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare News : राज्यातील शिंदे सरकार लवकरच पडणार, असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने नियमीत करण्यात येतो. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तर बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) (शिंदे गटातील) नाराज नेत्यांची यादीच सांगितल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुषमा अंधारे नाशिमध्ये बोलत होत्या. त्या यावेळी म्हणाले, राज्यात २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार आहे. शिंदे गटातील अनेक नेते नाराज आहेत, असा दावा अंधारे यांनी केला. नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे नाराज आहेत. औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट हे नाराज आहेत. या याधीही अंधार यांनी शिरसाट यांचे नाव घेतले होते. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी, असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या-ज्या लोकांना शिंदे घेऊन गेले होते, त्या सर्वांनाच मंत्रीपदाची गाजरे दाखवण्यात आली होती. मात्र, या सर्वच लोकांना संतुष्ट करणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच भाजपला अशक्य आहे. भाजपची (BJP) स्थिती घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे, अशी अवस्था झाल्याचा जोरदार टोला त्यांनी लगावला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर गेले होते. त्यांचा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला, असेही अंधारे म्हणाले. आमदार प्रताप सरकारनाईक, गीता जैन आणि नरेंद्र मेहता या तीन नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एका बैठकीत एकमेकांना बसायला खुर्च्या दिल्या नाहीत, असेही अंधारे यावेळी म्हणाल्या. त्यामुळे २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील हे नक्की, आहे, असे अंधारे यांनी सांगितले.

या वेळी अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे, व माजी खासदार निलेश राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहे. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. तो व्हिडीओ जुना आहे, विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहे,” असे अंधारे म्हणाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT