Satyajeet Tambe-Suresh Salunkhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News : सत्यजित तांबेंना पाठिंबा देणे पडले महागात : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गमावावे लागले

पक्षाविरोधात कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने साळुंखे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देणे काँग्रेसचे (Congress) नगरचे (Nagar) जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे (Suresh Salunkhe) यांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षाविरोधात कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने साळुंखे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे साळुंखे यांना नगरसारख्या जिल्ह्याचे अध्यक्षपद गमवावे लागणार आहे. (Suspension action against Nagar district president Suresh Salunkhe of Congress)

काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर करून आणि एबी फार्म देऊनही नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यामुळे तांबे पिता-पुत्रावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षातील काही पदाधिकारी तांबे यांना उघडपणे समर्थन देताना दिसत आहेत. त्यातच साळुंखे एक आहेत. साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

congress Letter

दरम्यान, सत्यजित तांबे यांचे मामा आणि विधीमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात मात्र या सर्व प्रकरणावर मौन साधून आहेत. त्यामुळे तांबे यांच्या खेळीला त्यांचा आशीर्वाद आहे की काय, अशी चर्चाही आता महाराष्ट्रात होत आहे. शिवाय, तांबे यांच्या उमेदवारीमागे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता उघड गुपीत राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT