Rajshree Ahirrao Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Collector Notice: आमदारकीचे स्वप्न पाहणारी, नोटीस मिळालेली तहसीलदार कोण?

Tahsildar Rajshree Gangurde News: शासकीय नोकरीत राहून सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या तहसीलदार गांगुर्डे-अहिरराव यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस.

Sampat Devgire

Nashik Revenue News : नाशिक रोड-देवळाली मतदारसंघातून इच्छुक म्हणून चर्चेत असणाऱ्या तहसीलदार राजश्री अहिरराव-गांगुर्डे यांच्या सोशल मीडियातील प्रसिद्धीकडे जिल्हा यंत्रणेने लक्ष घातले आहे. प्रशासकीय अधिकारी असताना छायाचित्र टाकून जाहिरातबाजी कशी करता, अशी विचारणा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केली आहे. त्यामुळे अहिरराव पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Collector Radhakrishna D. issued notice to Tahsildar Rajshree Ahirrao)

तहसीलदार राजश्री गांगुर्डे- अहिरराव गेले काही वर्षे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

तहसीलदार अहिरराव यांनी यापूर्वी देवळाली मतदारसंघात शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम करीत सरपंच तसेच अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी जवळीक वाढवल्याची चर्चा होती. त्याच्या बातम्याही होत्या. त्यामुळे विद्यमान आमदारांसह विविध नेत्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

अहिरराव यांचे ‘ओजस्वी फाउंडेशन’ या नावाने सामाजिक व्यासपीठ आहे. त्यामार्फत त्या सामाजिक उपक्रम राबवितात. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट टाकतात. देवळाली मतदारसंघात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. अहिरराव यांनीही स्वतः कधी त्या देवळाली मतदारसंघातून इच्छुक नसल्याचे खंडन केलेले नाही.

या पार्श्वभूमीवर देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी थेट विधानसभेत अहिरराव यांच्या कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. आता पुन्हा हा विषय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नोटीस काढून त्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या प्रसिद्धिविषयी प्रश्न विचारत खुलासा मागवला आहे.

-----

मी ओजस्वी फांऊडेशन या नोंदणीकृत संस्थेची संस्थापक अध्यक्ष असून, संस्थेमार्फत महिलांच्या विकास, आर्थिक स्वावलंबन स्वसुरक्षितेसाठी काम करते. जनतेचे प्रश्न सोडविण्याची व समाजसेवेची मला आवड आहे. प्रशिक्षण हा कार्यक्रम राजकीय नाही.

- राजश्री गांगुर्डे, तहसीलदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT