Threaten call to Bhujbal : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करीत बाहेर पडलेले तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे दिला आहे. याबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Unknown person phoned to Bhujbal`s Supporter Santosh Gaikwad)
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वतीने पुणे (Pune) पोलिसांत (Police) याबाबत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी हा कॉल ट्रेस करून धमकी देणारा फोन करणाऱ्यास कोकणातून अटक केल्याचे बोलले जाते.
श्री भुजबळ यांच्यासमवेत राहणारे संतोष गायकवाड यांच्या मोबाइल फोनवर ही धमकी देण्यात आली आहे, आपणाला सुपारी मिळाल्याचे सांगत आपण सांगून काम करतो, असे समोरून व्यक्ती सांगत होती.
कशासाठी सुपारी दिली, तुमचं श्री भुजबळ यांनी बिघडवलं असं विचारल्यावर समोरच्या व्यक्तीने ते काय माहिती नसल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. श्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक तसेच विशेष कार्य अधिकारी आणि स्वतः संतोष गायकवाड हे सध्या 'नॉट रीचेबल' आहेत
हा प्रकार काल रात्री पुणे शहरात घडला. श्री. भुजबळ काल पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. पुणे पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. संशयित व्यक्तीला कोकणातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. संशयीताचे नाव प्रकाश पाटील असल्याचे बोलले जाते. श्री भुजबळ हे आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले. त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.