Monica Rajale, Gokul Daund, Pratap Dhakne- Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: गोकुळ दौंड यांनी वाढवलं मोनिका राजळे-प्रताप ढाकणेंचं टेन्शन ?

Shevgaon-Pathardi Assembly Constituency : पाथर्डी-शेवगावमधील प्रस्थापितांची गणितं फिस्कटणार ?

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: आगामी 2024 वर्ष हे राज्यातील राजकारण्यांसाठी निवडणुकांचे असल्याने आतापासूनच संभाव्य आणि इच्छुक उमेदवारांनी आपापल्या उमेदवारीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यात नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात संभाव्य आणि इच्छुक उमेदवारांची रेलचेल आतापासूनच दिसून येत आहे. यात आता 2024 च्या निवडणुकांत मोठा प्रभाव टाकू शकणारे आणि वेळप्रसंगी मतविभाजनित बाजी मारू शकणारे इच्छुक आता उघडपणे पुढे येत आहेत. यात भाजप मधील एका गटाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे या सलग दोन टर्म लोकप्रतिनिधींत्व करत आहेत. या मतदारसंघांत वंजारीसमाज मोठ्या संख्येने आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानणारा वंजारी समाज आतापर्यंय भाजप मागे ठाम पणे उभा राहिला.

मात्र, 2019 ला परळीतून पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले असून यंदा पंकजा मुंडे यांचे शेवगाव-पाथर्डीतील समर्थक काही वेगळ्या "अंदाजा"मध्ये असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ओबीसी मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड हे काहीशा वेगळ्या निर्णय घेण्याच्या शक्यतेत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंडे गटाचे जुन्या कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यकारणीत लागलेली वर्णी विद्यमान आमदार गटाच्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हाध्यक्षांनी स्थगित केली. त्यामुळे नाराज मुंडे समर्थक गोकुळ दौंड आदींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली होती.

आता गोकुळ दौंड यांच्या व्हॉट्सअॅपच्या नंबरवरून 2024 लढणार अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. "घराणेशाही आणि कारखानदारांविरोधात, शेतकऱ्यांच्या-जनतेच्या शेतीच्या पाण्यासाठी, बेरोजगार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, तीन पिढ्या आमच्या शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी आणि कष्टकरी यांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी 2024 लढणार" या अर्थाने समाज माध्यमातून गोकुळ दौंड आपली भूमिका मांडत आहेत.

दौंड यांच्या पोस्ट समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने मतदारसंघात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मोनिका राजळे आणि मविआचे संभाव्य उमेदवार प्रताप ढाकणे यांना हा इशारा आसल्याचे मानले जात आहे. शेवगाव-पाथर्डी मतदातसंघातून विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे या प्रमुख प्रतिस्पर्धी यांच्यासह माजी आ.चंद्रशेखर घुले, 'वंचित'चे किसन चव्हाण, माजी जि.प.सभापती हर्षदा काकडे 2024 साठी संभाव्य उमेदवार असू शकतात. अशात आता भाजपचे मतदातसंघात मोठा प्रभाव असणारे गोकुळ दौंड काहीशी स्पष्ट भूमिका घेत पुढे येत असल्याने अनेकांची गणिते फिस्कटू शकतात, असे बोलले जात आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT