Balasaheb Thorat: मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांच्या स्वीय सहायकावर फसवणुकीचा गुन्हा

Sangamner: संगमनेरमध्ये मोठ्या घडामोडी, कामगारांना देण्यात येणारे दहा संच स्वीय सहायकांच्या शेतात आढळले
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Ahmednagar News : ग्रामपंचायतीच्या निवडणुकातील पराभवाची जिरवा-जिरवी आता पोलिसांकडून, म्हणजेच कायद्याच्या कचाट्यातून होणार असे दिसते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक विजय जगन्नाथ हिंगे ऊर्फ जगन्नाथ यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बांधकाम कामगारांना सरकारकडून संच दिले जातात. हे संच विजय हिंगे यांनी बळकवल्याची तक्रारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात ई-मेलवर गेली होती. या तक्रारीनुसार कामगार अधिकारी तुषार बोरसे व दुकान निरीक्षक ललित प्रकाश दाभाडे यांनी चौकशी केली. या अधिकाऱ्यांनी 17 नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजता संगमनेरचे तलाठी पंच म्हणून बरोबर घेतले. विजय हिंगे यांच्या निमगावजाळी-आश्वी बुद्रुक रस्त्यावरील शेतातील घरी जाऊन तपासणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb Thorat
Raosaheb Danve News : विदर्भातल्या मुली लग्न करून आमच्याकडे निवडणूक लढवतात , आता आम्हालाही ओबीसीत घ्या..

यावेळी तिथे कामगारांना देण्यात येणारे दहा संच आढळले. या एका संचाची किंमत 8 हजार 500 रुपये आहे. आढळून आलेल्या दहा संचाची किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. अधिकारी ही कारवाई करत असताना त्यांच्या कामात काही जणांनी अडथळा आणला. अधिकाऱ्यांनी परिसरात चौकशी केल्यावर या संचा शेजारी काही कागदपत्रे आढळली.

ही बनावट होती. कुणाच्या तरी बनावट नावाने ही संच वाटल्याचे दाखवले गेले होते. परंतु हे संचाचे वाटपच झाले नाही. त्यामुळे सरकारची फसवणूक करणे आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कामगार अधिकारी तुषार बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईच्या निषेधार्थ गावबंद

दरम्यान, या कारवाई मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थोरात-विखे गट भिडले होते. थोरात गटाने विखे गटाचे पानिपत केले. विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखाली आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीत थोरात गटाची सत्ता आली.

यातूनच विरोधक हा वचपा काढत असल्याचा आरोप होत आहे. या कारवाई विरोधात आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीची शनिवारी गावात सभा झाली. यावेळी निषेध नोंदवून गावबंद ठेवण्यात आले होते. थोरात गटाने या कारवाईविरोधात गाव बंद ठेवून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Edited by Ganesh Thombare

Balasaheb Thorat
Amol Kolhe News: 'घोडा मैदान जवळच आहे, बारीला तयार रहा'; अमोल कोल्हेंनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com