Taloda Nagar Parishad election Bhagyashree Chaudhary Won: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Taloda Nagar Parishad Result 2025 : भाजप-शिवसेनेचा धुव्वा: अजितदादांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली; तळोद्यात मंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्फळ

Taloda Nagar Parishad election Bhagyashree Chaudhary Won: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोदा येथे जाहीर सभा घेतली होती. भाजपच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभांचा धडाका लावला होता.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तळोदा नगरपरिषदेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या नाकावर टिचून राष्ट्रवादीने पालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या उमेदवाराचा येथे दारुण पराभव झाला आहे.

तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधीलच पक्षांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दर्शवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी सातव्या फेरीअखेर 3,428 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोदा येथे जाहीर सभा घेतली होती. भाजपच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभांचा धडाका लावला होता. मात्र, एवढी मोठी रसद असूनही भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी नाकारले आहे.

एकूण 21 जागांच्या या रणसंग्रामात राष्ट्रवादीने 11 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फौज असूनही शिवसेना शिंदे गट 7 जागांवर अडकली आणि भाजपची अवस्था तर अत्यंत बिकट झाली असून त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मिळालेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चारही नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यातील नंदुरबार पालिकेवर शिवसेना, नवापूर व तळोदा पालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) तर शहादा पालिकेवर जनता विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT