Nashik Crime News : नाशिकमध्ये TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये मुस्लीम धर्माच्या संशयितांकडून हिंदू महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांचे लैगिंक शोषण व धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत असून केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास हाती घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये असून कोलकाता येथून ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, नाशिकमधील हे प्रकरण खूप गंभीर आहे. याप्रकरणी आम्ही कठोर कारवाई करतोय. टीसीएसमध्ये घडलेलं हे प्रकरण हा एका कटाचा भाग आहे. या प्रकरणात कुणाचीही पाठराखण केली जाणार नाही असा थेट इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
नाशिकमधील (TCS) च्या युनिटमध्ये हिंदू कर्मचारी महिला व मुलींचा झालेला कथित लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात सामील असलेल्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला जाईल असा विश्वास सरकारला असल्याचं फडणवीस म्हणाले.
कंपनीच्या भूमिकेची दखल घेत त्यांनी सांगितले की, TCS ने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासात सहकार्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. TCS कंपनीच्या प्रमुखांनी देखील या घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून तो एका संघटित टोळीने केला आहे. आम्ही ही टोळी उघड करू. कटाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत याचा आम्ही तपास करु. यासाठी आम्ही केंद्रीय यंत्रणांचीही मदत घेत आहोत, या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही वाचवले जाणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, तपासात असे समोर आले आहे की, सात पुरुष आरोपी संघटित टोळीप्रमाणे काम करत होते आणि महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत होते. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात TCS नाशिक युनिटमधील सहा पुरुष कर्मचारी आणि एक महिला HR मॅनेजर यांचा समावेश आहे. आणखी एक महिला आरोपी फरार आहे.
पीडित हिंदू महिला व मुलींच्या तक्रारीनुसार, संशियत टीम लीडर्सनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. नमाज पठण करण्यास भाग पाडले आणि गोमांस खाण्यासही प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.