Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान गरोदर, कुटुंबियांचा खळबळजनक दावा ; अटकपूर्व जामीन मिळणार का?

Nashik tcs conversion case : निदा खान गरोदर असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच याप्रकरणात तिला मुद्दाम अडकवलं जातय असा दावाही तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
Nida Khan
Nida Khan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमधील TCS कंपनीत मुस्लीम धर्माच्या संशयितांनी हिंदू महिला व मुलींना लक्ष्य करत त्यांचे लैगिंक शोषण, अत्याचार व धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली असून संशयित आरोपी निदा खान ही हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फरार आहे. पोलिसांची पथके तिच्या शोधात असून गेल्या २० दिवसांपासून ती पोलिसांना गुंगारा देत असून हाती लागलेली नाही. दरम्यान आता निदा खान गरोदर असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

गरोदर असल्या कारणामुळे निदा खान हिने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला जामीन मिळणार की नाही ते पाहावे लागणार आहे.

तसेच निदा खान ही संबधित TCS कंपनीत एचआर असल्याचं सांगितलं जात होत. मात्र प्रत्यक्षात ती प्रोसेसिंग असोसिएट आहे. तसेच तिला या प्रकरणात विनाकारण अडकवले जात असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. निदा खानचे वकील बाबा सिद्दकी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणामुळे निदा खानचे आई-वडील प्रचंड धक्यात आहेत. त्यांच्या मते निदाने काहीही केलेले नाही. २०२१ मध्ये ती नाशिक येथील TCS च्या बीपीओ युनिटमध्ये रुजू झाली होती.

Nida Khan
Nashik Crime : कर्मचारी महिलांवर अत्याचार, धर्मांतर ; नाशिकमधील त्या मल्टिनॅशनल IT कंपनीला लागणार कायमचं टाळं...

आपण गरोदर असून अशा अवस्थेत जर अटक झाली तर पोटातील बाळावर हा मोठा अन्याय होईल असं तिचं म्हणणं आहे. तसेच अटक न करता, तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचाही दावा निदा खान हिने केला आहे.

ती गरोदर असल्याने तिला जामीन मिळावा, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे. निदा खान ही या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी असून नाशिक पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात दाखल या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

तसेच या प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी शफी भिकन शेख याला तुरुंगातील कैद्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही निदा खानने प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच निदा खान सध्या मुंबईत किंवा मुंबईजवळ लपल्याची माहिती मिळत आहे.

Nida Khan
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

दरम्यान निदा खानला कंपनीने निलंबित केलं आहे. निलंबन पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे की निदा २७ डिसेंबर २०२१ पासून कंपनीत 'प्रोसेस असोसिएट' म्हणून काम करत होती. या नव्या माहितीमुळे संभ्रम अधिक वाढला असून प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com