Vivek Kolhe CM Eknath Shinde
Vivek Kolhe CM Eknath Shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Teachers Constituency 2024 : विवेक कोल्हे म्हणतात, 'सरकारी धाडींना मतांच्या धाडीने उत्तर'

Sampat Devgire

Nashik News : शिक्षक मतदार संघाचे मतदान बुधवारी झाले. यावेळी मतदान केंद्रांना उमेदवारांनी भेटी दिल्या या निवडणुकीत 93.48 टक्के मतदान झाले. यावेळी येवला तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने समाधान व्यक्त केले.

अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी राज्य सरकार आणि शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यावर अतिशय गंभीर शब्दात टीका केली. आमदार दराडे यांनी प्रशासनाचा दुरुपयोग करून गैरप्रकार केले. पैसे वाटप झाल्याच्याही तक्रारी आहेत. मतदार यादीत घोळ केला. त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

कोल्हे म्हणाले, निवडणुकीच्या आधी आमच्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थांवर शासनाच्या विविध विभागांनी धाडी टाकल्या.त्यात काहीच सापडले नाही. कारण आमचे काम पारदर्शक आहे. मात्र सरकारच्या या धाडींना शिक्षक मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर धाडी टाकून उत्तर दिले आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान (Voting) झाल्याने आपल्या विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचे तसेच वस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाने पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी देखील मतदारांना वस्तुंचे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा करत त्याची तक्रार देखील करण्यात आली होती.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT