Gau Rakshak Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gau Rakshak Crime : गोरक्षकांची मारहाण? टेम्पो चालक युवकानं संपवलं जीवन; नातेवाइकांचा न्यायासाठी पोलिसांसमोर ठिय्या

Aniket Waditke Family Protests at Loni Police Station in Ahilyanagar Over Gau Rakshak Case : गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीचे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने टेम्पो चालक युवकाने आत्महत्या केल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त करत आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar news : गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने त्यातून झालेल्या बदनामीमुळे टेम्पो चालक युवकाने स्वतः जीवन संपवल्याचा प्रकार घडला आहे.

टेम्पो चालक अनिकेत वडितके, असे मयत युवकाने नाव आहे. गोरक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मयत युवक सोमनाथ वडितके यांच्या नातेवाइकांनी राहाता तालुक्यातील लोणी पोलिस (Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.

अनिकेत वडितके हा टेम्पो चालक आहे. या युवकाला गोवंश वाहतुकीचे भाडे मिळाले होते. राजुरीला गोवंश सोडण्यासाठी तो टेम्पो घेऊन चालला होता, असे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र गोरक्षकांनी त्याचा टेम्पो अडवला. त्याच्याकडे चौकशी करून, अपूर्ण माहितीच्या आधारे त्याला मारहाण केली. या मारहाणीचे फोटो काढले. तसेच गोरक्षकांनी गोवंश वाहतूक कशी रोखली, याची माहिती समाज माध्यमांवर (Social Media) व्हायरल केली.

समाज माध्यमांवर व्हायरल केलेली माहिती आणि फोटो देखील समोर आले आहेत. बजरंग दल लोणी शहर या समाज माध्यमाच्या ग्रुपवर गोरक्षकांनी गोवंश घेऊन जात असलेल्या टेम्पो कसा पकडला, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून, गोवंश गोशाळेत जमा केल्याची माहिती शेअर करण्यात आली आहे.

गोरक्षकांनी व्हायरल केलेल्या मेसेजचा मजकूर

समाज माध्यमांवरील बजरंग दल लोणी शहर या ग्रुपवर शेअर केलेली माहिती अशी, @गोरक्षकदलराहाता @श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान एक देशी गोवंश जप्त असे लिहित पुढे, हकीकत जी की गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली की, ममदापूर गावातील सराईत कसाई, मुंतजहिर कुरेशी यांनी गुहा गावातून एक देशी गोवंश शेतकऱ्याची हिंदू दलाल पाठवून फसवणूक करून पाळण्यासाठी द्या अश्या ने कत्तली साठी ममदापूर येथे घेऊन जात आहे!!

गोरक्षकांचा व्हायरल मेसेजमध्ये दावा

त्वरित गोरक्षक यांनी ममदापूर रोड येथे सापळा रचून TATA ACE गाडी पकडली असता. त्यामध्ये एक देशी गोवंश हिंदू दलाल मिळून आले !! त्याचा मोबाईल तपासला असता मुंतजहिर कुरेशी याचे त्याला फोन येत होते; व कसाई यांचे फोटो दिसून आले व गोरक्षक यंची खात्री पटली!! त्वरित गोरक्षक यांनी dial 112 वर संपर्क करून पोलिस मदत मिळवली व लोणी पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम 1995 चे सुधारित 2015 चे कलम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून!! गोवंश गोशाळा मधे सोडण्यात आला, असा मजकूर व्हायरल केला आहे.

अनिकेतने मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचे सांगितलं

हा मजकूरानंतरच आपल्या टेम्पो चालक अनिकेत वडितके यांनी जीवन संपवलं. यावर अनिकेतचे वडिल सोमनाथ वडितके म्हणाले, "माझी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मी घरीच होतो. त्यामुळे मुलगा अनिकेत हा टेम्पो चालवत होता. त्याला राजुरी इथं एक गोवंश घेऊन जाण्यासाठी भाडे आले. तो घेऊन ती राजुरीला घेऊन जात असताना, त्याला बजरंग दलाच्या मुलांनी आडवलं. त्याला मारहाण केली. वाहन पोलिस ठाण्यात जमा केले. सायंकाळी घरी आल्यावर अनिकेत याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्याने जीवन संपवलं. मी पोलिस ठाण्यात येऊन, तक्रार देत आहे, पण त्याची दखल घेतली नाही. माझा मुलगा गेलेला आहे. समोरच्यांवर कारवाई झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे."

मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले

मयत अनिकेतचा भाऊ याने देखील प्रतिक्रिया देताना म्हटले की, अनिकेत टेम्पो घेऊन जात असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवले. मारहाण केली. त्याचे व्हिडिओ,फोटो काढले. यानंतर त्याचा काही गुन्हा नसताना, व्हिडिओ व्हायरल केले. पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी आलो असताना, गुन्हा देखील दाखल करून घेत नाहीत. अनिकेतच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी देखील झालेली नाही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर नातेवाइकांनी लोणी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT