Sangamner News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Morcha: संगमनेरमध्ये 'भगव्या मोर्चा'ला गालबोट; दोन गटात दगडफेक, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Hindu Jan Akrosh Morcha - Bhagwa Morcha: संगमनेरच्या समनापूर गावात तणावपूर्ण शांतता

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : संगमनेरमध्ये लव्ह जिहाद विरोधात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले. पण या मोर्चाला गालबोट लागलं असून संगमनेरच्या समनापूर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोर्चा पार पडल्यानंतर गावाकडे परतत असताना दोन गटात दगडफेक झाली. यामध्ये काही गाड्यांचे नुकसान झाले. तर यात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सध्या समनापूर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. मात्र, हा वाद का झाला? याची माहिती पोलीस घेत असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक गावातील नागरिक सहभागी झाले होते. तर अनेक गावामध्ये आज कडकडीत बंद देखील पाळण्यात आला आहे. समनापूर गावामध्ये घडलेल्या या प्रकारानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT