Sanjay Raut in Nashik : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी (ता. २ जून) पत्रकार परिषदेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते थुंकले होते. त्यांच्या या कृतीनंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याचे पडसाद शनिवारी (ता. ३) नाशिक येथेही पाहायला मिळाले. संजय राऊत शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते.
श्रीकांते शिंदे (Shrikant Shinde) यांचे नाव घेताच सजंय राऊत यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात राऊतांविरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यातच संजय राऊत शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांना भिडले. त्यामुळे नाशिकमधील वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने शांतता कायम राहण्यास मदत झाली.
संजय राऊत नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचा ताफा शिवसेनेच्या कार्यालयासमोरून गेला. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. राऊत यांच्या वाहनासमोरच ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकमेकांना भिडले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत ठेवले. यावेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.
राज्यभर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या कृतिबद्दल खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रकरणावर राऊतांवर होणारी टीका काही कमी होत नाही.
संजय राऊत म्हणाले होते की, "मी कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी कोणत्याही राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांची नावं आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यातून ती कृती झाली. यांना काही कळतं का?"
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.