Karnataka Bjp : विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपत मोठी चुरस; 'या' चार नेत्यांची नावे आघाडीवर

विरोधी पक्षनेतेपदासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
BJP
BJP Sarkarnama

बंगळूर : कर्नाटकातील (Karnataka) भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठीही जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. (Big fight in BJP for the post of leader of opposition in Karnataka BJP)

दरम्यान, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक, माजी मंत्री सुनील कुमार आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

BJP
Nashik Shivsean News : त्र्यंबकेश्वरमध्ये दादा भुसे-संजय राऊत आले समोरासमोर; पण एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही

माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली आहे. आधीच भाजपचे राष्ट्रीय नेते पक्षाच्या आमदारांसोबत अनौपचारिक बैठका घेऊन विचारविनिमय करण्यात येत आहे. मात्र, येत्या जुलैमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी (leader of opposition) वाढलेल्या स्पर्धेमुळे भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

BJP
Dhananjay Munde Advice Pankaja : पंकजाताई, कुठं काय बोलावं अन्‌ त्या बोलण्यानं आपलं नुकसान होणार नाही, याची काळजी घे; धनंजय मुंडे यांचा सल्ला

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक, माजी मंत्री सुनील कुमार आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे असल्याने भाजप मापूनतोलून निर्णय घेत आहे. कारण, काँग्रेस सरकारचे अपयश आणि चुका लोकांसमोर आणण्यासाठी आणि उपलब्ध प्रत्येक संधीचा यशस्वीपणे वापर करण्यासाठी भाजपच्या दृष्टीने विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे.

BJP
Ajitdada Vs Sanjay Raut : धरणात XXXपेक्षा थुंकणं चांगलं; ज्याचं जळतं, त्याला कळतं; संजय राऊतांचा अजितदादांवर पलटवार

राज्यातील विरोधकांच्या हल्ल्याला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ आमदार असल्याने भाजपमध्येही असाच नेता निवडण्याचा निर्णय नेत्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com