Karan Pawar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karan Pawar News: जळगावमधून ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात; स्मिता वाघ यांच्यासमोर कडवे आव्हान

कैलास शिंदे

Jalgaon News: जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha Constituency 2024) शिवसेना ठाकरे गटातर्फे पारोळा येथील करण पवार (Karan Pawar) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईत ठाकरेचे निवासस्थान 'मातोश्री'वरही ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency 2024 Thackeray group Candidature Karan Pawar)

जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रथमच महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. पक्षातर्फे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, कॉंग्रेसमधून भाजप नंतर शिवसेना ठाकरे गटात आलेल्या ललिता पाटील उमेदवारीसाठी इच्छुक होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार उन्मेश पाटील व पारोळा येथील भाजपचे युवा नेते व माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभेसाठी करण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने करण पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दोघांचा सामना होणार हे निश्‍चित झाले आहे.

करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे घराणे राजकीय आहे, त्यांचे आजोबा (कै.)भास्करराव पाटील हे पारोळ्याचे माजी आमदार होते, तर त्यांचे काका डॉ. सतीश पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब पवार हे सहकार क्षेत्रात कार्य करतात. करण पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्य केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.

पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. युवा वर्गात त्यांचे मोठे मित्रमंडळ आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या समोर कडवे आव्हान उभे करतील. त्यांच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाला आता खऱ्या अर्थाने लोकसभेत मोठे आव्हान उभे राहिले आहे. याशिवाय करण पवार यांच्या साथीला भाजपचे नाराज माजी खासदार उन्मेश पाटील असणार आहेत, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचीही त्यांना भक्कम साथ असणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT