Unmesh Patil News: एका भावाने दगा दिला पण दुसरा भाऊ माझ्यासोबत; ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांच्या भावना

Unmesh Patil Join Thackeray Group:आपल्या कामाची दखल भाजपने घेतली नाही. मी सकारात्मक राजकारण केले. बदल्याच्या राजकारणामुळे मनाला वेदना होतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली.
Unmesh Patil News
Unmesh Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उन्मेष पाटील (Unmesh Patil ) यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आपल्या कामाची दखल भाजपने घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

"एका भावाने दगा दिला, पण दुसरा भाऊ माझ्यासोबत आहे," अशा भावना उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केल्या. मी सकारात्मक राजकारण केले. बदल्याच्या राजकारणामुळे मनाला वेदना होतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. (Unmesh Patil Join Thackeray Group)

भारतीय जनता पक्षात बदला घेण्याची राजनिती अत्यंत वेदनादायी आहे, सतत करण्यात आलेली अहवेलना ही स्वाभिमान दुखावणारी आहे,. त्यामुळे स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले. मातोश्रीवर आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत पारोळा येथील भाजपचे युवा नेते करण पवार यांनीही शिवबंधन बांधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. त्यांच्यासह पारोळा येथील भाजपचे युवा नेते व माजी नगराध्यक्ष करण पवार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले, यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेा ठाकरे गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

उध्दव ठाकरे म्हणाले. "वापरा आणि फेकून द्या ही भाजपची भूमिका आहे, त्यामुळे तुम्ही काम करूनही तुमची किंमत त्यांनी केलेली नाही, मात्र आज तुम्ही जनमताच्या प्रवाहात आला आहात. जळगावात आमच्यासोबतही गद्दारी झाली आहे. तुमच्या प्रवेशामुळे आता जळगाव लोकसभेत शिवसेनेचा अस्सल भगवा विजयी होईल,"

खासदार उन्मेष पाटील, "भारतीय जनता पक्षाने आपल्या कामाची किंमत केली नाही, नेहमीच आपला स्वाभिमान दुखावला आहे.बदला घेण्याच्या भावनेनेच त्यांनी माझ्याशी वर्तणूक केली आहे. आमदार म्हणून मी चांगले कार्य केले होते, मला खासदारकीची उमेदवारी नको होती,त्यावेळी बदला घेण्याच्या भावनेने मला उमेदवारी दिली. तरीही मी विकासात्मक बदलाच्या दृष्टीने उमेदवारी स्विकारून मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदार संघात विकासाचे काम केले,"

Unmesh Patil News
Supriya Sule News: सुळेंनी मानले आंबेडकरांचे आभार; एकत्रित काम करण्याची दिली ग्वाही

"गिरणा नदीच्या विकासासाठी परिक्रमा केली. परंतु विकासाचे राजकारण भाजपच्या नेत्यांना मान्य झाले नाही. त्यांनी माझे कौतुक केले नाही, उलट माझी अहवेलना केली, भाजपचा बदला घेण्याच्या राजकारणामुळे आपला स्वाभिमान दुखावला. स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी तसेच जनतेचा विकास करण्यासाठी आपण स्वाभिमानाने कार्य करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून आपण शिवसेनेची मशाल आपण कार्याच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात तेवत ठेवणार आहोत," असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com