उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून करण पवारांचंही नाव चर्चेत!

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदार संघावर गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आहे.

कैलास शिंदे

Jalgaon Shivsena UBT News : जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. या मतदार संघातून सध्या भाजपत असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नावाची चर्चा सुरू आहे. करण पवार यांना ठाकरे गटाने  आपल्याकडे घेवून उमेदवारी दिल्यास  जळगाव लोकसभा मतदार संघात ‘मशाल’ व ‘कमळा’ची काट्याची लढत होवू शकते, असं बोललं जात आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघ राजकीय दृष्टीने महत्वाचा आहे. या लोकसभा मतदार संघावर गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष कोणता उमेदवार देणार याकडेच लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी महाविकास आघाडीत हा मतदार संघ ठाकरे गटाकडे गेला आहे. या पक्षातर्फे प्रथम माजी महापौर कुलभूषण पाटील, भाजपतून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ललीता पाटील इच्छुक होते. परंतु भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे.

आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, चाळीसगावर येथील उत्तमराव महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार गटाचे प्रमोद पाटीलही मशाल घेवून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्‍चित झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यातच आता भाजपचे युवा पदाधिकारी व पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ते सद्यस्थितीत प्रबळ उमेदवार ठरू शकतील व लोकसभा मतदार संघातील लढतीचे गणित बदलवतील असेही सांगण्यात येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT