Loksabha Election 2024 : जळगाव जिल्ह्यात भाजप नवा इतिहास घडवणार; दोन्ही खासदारांबाबत मोठा निर्णय घेणार?

Jalgaon Political News : गेल्या चार ते पाच पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेच जळगाव व रावेर मतदारसंघांतून खासदार निवडून आलेले आहेत.
Raksha Khadse
Raksha Khadsesarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेश पाटील खासदार आहेत, तर रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे खासदार आहेत. पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे, तर खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांची तिसरी टर्म असणार आहे. मात्र, या वेळी दोन्ही मतदारसंघांतील खासदारांची उमेदवारी पक्षातर्फे कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास हा इतिहास घडणार आहे.

कारण पक्षाने आजपर्यंत दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारी कापलेल्या नाहीत. विद्यमान खासदार हरिभाऊ जावळेंची उमेदवारी कापण्यात आली होती. मात्र, त्यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून ए. टी. पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती, तर 2019 मध्ये खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली होती. मात्र, रावेरमधून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती.

त्यामुळे भाजप आता काय करणार याकडे लक्ष असणार आहे. दोन्ही खासदारांच्या उमेदवारी रद्द करून इतिहास घडविणार, की दोन्ही खासदारांच्या उमेदवारी कायम ठेवून वर्तमान चालू ठेवणार आहे. तसेच एका खासदाराची उमेदवारी कापून दुसऱ्या खासदाराला आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे उमेदवार कायम ठेवणार आहे. याकडेच आता खऱ्या अर्थाने लक्ष आहे.

Raksha Khadse
Citizenship Amendment Act : देशात लागू होणार CAA? पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा...

जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हटला जात आहे. गेल्या चार ते पाच पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेच जळगाव व रावेर मतदारसंघातून खासदार निवडून आलेले आहेत. पक्षाने दोन्ही खासदारांची उमेदवारी आजपर्यंत कधीही कापलेली नाही. कधी रावेरचा उमेदवार बदलला आहे, तर कधी जळगाव लोकसभेचा बदलला आहे. मात्र, या वेळी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू आहेत. असे झाल्यास पक्षाचा हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे, परंतु दोन्ही खासदारांची उमेदवारी कायम राहिल्यास नव्याने वर्तमान घडणार आहे.

जळगाव जिल्हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा गड होता. या ठिकाणी काँग्रेसने कोणीही उमेदवार दिला तरी तो निवडून दिला जात होता. अगदी मुंबई येथील तत्कालीन नेते नवशेर भरूचा यांना काँग्रेसने जळगाव विधानसभेत उमेदवारी दिली होती. त्यांनाही या ठिकाणच्या जनतेने निवडून दिले होते. मात्र, कालांतराने जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे(BJP) आपले चांगलेच पाळेमुळे जमविले आहेत. अगदी ग्रामीण भागापर्यंत हा पक्ष पोहोचला आहे. जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपने गेल्या पाच पंचवार्षिकपासून हिसकावून घेतले आहेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही काँग्रेसला दोन्ही मतदारसंघ राखता आलेले नाहीत. पैसे घेऊन संसदेत प्रश्‍न विचारण्याच्या आरोपात काही खासदार निलंबित झाले होते, त्यात भारतीय जनता पक्षाचेही जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार होते.

या वेळी दोन्ही मतदारसंघांत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन एरंडोल लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मोरे यांनी बाजी मारली होती. हाच एक भाजपचा पराभव झाला होता. मात्र, पुन्हा झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळविले . परंतु, त्यावेळी पोटनिवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र भारतीय जनता पक्षाने पुन्हा विजय मिळविला होता, हा लोकसभा मतदारसंघ त्यावेळी आघाडीत कॉंग्रेसकडेच होता. मात्र, तरीही यश मिळाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालांतराने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांची अदलाबदल झाली. पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ हा जळगाव लोकसभा झाला तर जळगाव लोकसभा मतदारसंघ आता रावेर लोकसभा मतदारसंघ झाला आहे. मात्र, या बदलातही भारतीय जनता पक्षाने दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात आजपर्यंत यश मिळविले आहे.

जळगावातून निकम की वाघ?

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी बदलाचाच विचार केला तर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले जिल्हा दूधसंघाचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. त्यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचेही सांगण्यात येत आहे, तर माजी आमदार स्मिता वाघ यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करूनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.

रावेरमधून डॉ. केतकी की मंत्री महाजन?

रावेर लोकसभा मतदारसंघातही उमेदवारी बदलाचा पक्षाने निर्णय घेतल्यास पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांच्या कन्या डॉ. केतकी महाजन यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर पक्षातर्फे या मतदारसंघातून पक्षाचे नेते व राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे. महाजन यांना उमेदवारी मिळाल्यास पक्षातर्फे राज्यातील मंत्री निवडणूक लढण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Raksha Khadse
Chandrahar Patil Join Shivsena UBT : 'अब की बार चंद्रहार!' सांगलीसाठी ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पाटील उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com