Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`ती` बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली, तेव्हा साहित्यिक गप्प कसे बसले?

Sampat Devgire

नाशिक : कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य म्हणजे मिळालेली भिक म्हणते. खरं म्हणजे त्यापेक्षाही वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रातील एक बुजुर्ग उठतो आणि तो तीला पाठींबा देतो. यावर कोणीही साहित्यिक बोलला नाही, याचे वाईट वाटते, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी न्या. नरेंद्र चपळगावकर, अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्याध्यक्ष हेमंत टकले, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

श्री. थोरात यांनी यावेळी संत साहित्य, चळवळ तसेच विविध कालखंडातील समतेच्या लढ्यांचे संदर्भ देत त्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ, आणिबाणी याबाबत त्यांनी विविध प्रसंगांचे संदर्भ सांगितले.

ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ती त्यांच्या लिखानातून पेटवली हे आपल्याला विसरता येणार नाही. महात्मा गांधींनी सुध्दा आपल्या लिखानातून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. लेखक म्हणून हे आपल्याला विसरता येणार नाही. अनेक लेखक आहेत की, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीला धार आणण्याचे काम त्या कालखंडामध्ये केले. त्यातून आपण पाहतो की, अनेक चळवळी उभ्या राहिल्या. लेखन, समतेचा संपूर्ण देशात होणारा प्रसार, ज्या चळवळी होत्या त्याचा पिरपाक आपल्याला दिसतो. आपल्या राज्यघटनेमध्ये नेमके काय उतरलं तर त्या सगळ्या संतांच्या, त्या चळवळींचा सार, परंपरा आपल्या राज्यघटनेत आल्या आणि आपल्या राज्यघटनेत आपल्याला भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असा काही किमयागार मिळाला की, आपण राज्यघटनेचे प्रीअँबल जरी वाचले तरी कळते की, आपली संस्कृती काय, आपले विचार काय, ते वेगळे नाही हे सांगणारं किमयागार बाबासाहेबांच्या रुपाने आपल्या सगळ्यांना मिळाला.

ते पुढे म्हणाले, खरं म्हणजे लेखकाची ताकद खुप मोठी असते. त्यात इतिहास पुर्णपणे बदलण्याची ताकद असते. स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. परंतु कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य म्हणजे मिळालेली भिक म्हणते. खरं म्हणजे त्यापेक्षाही वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रातील एक बुजुर्ग उठतो आणि तो तीला पाठींबा देतो. यातून अपमान झाला तो स्वातंत्र्य चळवळीतील सगळ्या घटकांचा अपमान झाला. कदाचीत तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काही आक्षेप असेल, पंडीत जवाहरलाल नेहरूंबद्दल असेल, परंतु स्वातंत्र्य चळवळीबद्दल पूर्ण आक्षेप घेणे आणि त्याला भीक म्हणने हे अत्यंत चुकीचे आहे. परंतु आमच्या साहित्यिक, आमच्या सगल्या बांधवांकडून माझी एक नागरिक या नात्याने अशी अपेक्षा आहे की, यावर कोणता साहित्यिक काही बोलला नाही. याचं थोडं वाईट वाटून गेले, हे सांगायला हरकत नाही. यावर बोलण्याची तुमची जबाबदारी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT