नाशिक : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे योगदान व त्यासाविषयी चर्चा होऊ शकत नाही. स्वातंत्र्य चेतना सामान्यांत प्रज्वलीत करण्यासाठी त्यांनी केलेले लिखान अजरामर आहे, असे प्रतिपादन शरद पवार (Veer Savarkar) यांनी केले.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक धुरीनांनी राजकीय, सामाजिक चळवळीसह मराठी भाषेच्या व्यापक विकासासाठी देखील मोठे योगदान देऊन भाषेची सेवा केली. सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यामुळे त्यांच्या नावाला मराठी माणुस व नाशिककर व्यक्ती कदापीही विरोध करू शकत नाही. संमेलन नगरीला कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांचे नाव देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. त्याने या संमेलनाची उंची वाढली.
ते म्हणाले, मराठी भाषेच्या इतिहास व वाटचाल विचारात घेतली तर राज्यकर्ते आले तसे या भाषेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराज सत्ते येण्यापूर्वी तर राज्य कारभारात फारसीचा सुळसुळाट झाला होता. महाराजांनी रघुनाथ हणमंते व पुढे धोंडीराम व्यास यांच्यावर मराठीचा राज्यकारभारात वापर करण्याची जबाबदारी सोपवली. मराठा साम्राज्य विस्तारले तसा मराठीचाही विस्तार झाला.
स्वातंत्र्यनंतर देखील मराठीला न्याय मिळालेला दिसत नव्हता. भाषावार प्रांत रचनेनंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासावर विशेष लक्ष दिले. इंग्रजी हे वाघिनीचे दूध असेल मात्र ऐत्तदेशीय भाषेला देखील प्रोत्साहन दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आजच्या इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर ही भाषा झळकली तरच तीचा विकास गतीने होईल अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.
श्री. पवार म्हणाले, या संमेलनाला येतानाच मी, राज्याचे मुख्य सचिव व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या समस्यांवर चर्चा होते, हे घडायला नको. हे संमेलन पार पडल्यावर पुन्हा एकदा वरिष्ठ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या प्रमुखांसह बैठक करावी. त्यात याविषयीच्या प्रश्नांचा लेखा ोजखा मांडला जावा. त्यातून या कमतरता दूर करू. आवश्यक असेल त्या दुरुस्ती करू. ही खबरदारी राज्यकर्ते म्हणून आपल्याला घ्यावी लागेल. त्यातून कसा मार्ग काढायचा तो काढला जाईल. जे करायचे ते करू व मराठी भाषेच्या विकासासाठी निर्णय घेऊ.
यावेळी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, खासदार श्रीनिवास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, हेमंत टकले, डॅा. दादा मोरे, रामचंद्र काळुंखे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. प्रशांत पाटील, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.