Jalgaon News : गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी रविवारी येथे दिली.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चाऱ्याच्या गंजित लपवून ठेवल्याची अमानवी घटना घडली होती. या प्रकरणी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पीडितेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांत्वन केले होते. गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पिडितेच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली.
यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस (Police) निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल. मात्र, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल.
शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ ही देण्यात येईल. असे ही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली होती.
पोलीस व्हॅनवर अनावधानाने दगडफेकीची घटना झालेली होती. यावर पोलीस विभागाने चार ते पाच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. गावकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत. अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.