Pune Politics : वळसे-आढळरावांच्या मोदी भेटीने शिरूर लोकसभा अन् आंबेगाव विधानसभा भाजपसाठी 'सेफझोन' ?

Shirur-Ambega Politics : नरेंद्र मोदी यांनी दोघांचेही हात आपल्या हातात जाहीरपणे घेतल्याने वळसे-आढळराव यांचाही आता हातात हात राहणार हे निश्चित झाले.
Dilip Valse Patil, Shivajirao Adharao Patil Narendra Modi
Dilip Valse Patil, Shivajirao Adharao Patil Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले अन शिरूर-आंबेगाव भाजपसाठी ते मतदारसंघ सेफ (सुरक्षित) करुन गेले, असे चित्र सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि आंबेगाव-शिरूर विधान सभामतदारसंघात दिसते. कारण हे दोन्ही मतदार संघ कायमच मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil)- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राजकीय द्वंद्व आणि एकमेकांच्या कुरघोडींमुळे सन २००४ पासून चर्चेत राहीले आहे. अशातच यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचेही हात आपल्या हातात जाहीरपणे घेतल्याने वळसे-आढळराव यांचाही आता हातात हात राहणार हे निश्चित झाले.

पर्यायाने हे संपूर्ण राजकारण मोदींनी आपल्या पथ्यावर पर्यायाने भाजपासाठी (BJP) सेफझोन करुन घेतल्याचे चित्रही आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर १९९० पासून विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची एकहाती सत्ता आणि अंकुश राहीला आहे. आंबेगावचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भोवती ठेवून वळसे यांनी आपली राजकीय मांड पक्की केली. पुढे या मतदार संघातील सर्व निर्णय आपल्या मनासारखे व्हावेत म्हणून त्यांचा अट्टाहास त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या माध्यमातून कायम ठेवला.

Dilip Valse Patil, Shivajirao Adharao Patil Narendra Modi
Jayant Patil News: अमित शाहांची भेट घेतलीच नाही; जयंत पाटलांनी दावा खोडून काढला

स्वत: शरद पवार यांची इच्छा असतानाही वळसेंचे जवळचे मित्र राहिलेले शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adharao Patil) यांना २००४ मध्ये लोकसभेच्या तिकीटापासून दूर ठेवले. याच कारणाने पुढे आढळराव-वळसे युध्द सुरू झाले आणि एकमेकांना जोखण्याचा खेळ सुरू झाला. तब्बल तीन पंचवार्षिक आढळरावांनी वळसेंनाही जेरीस आणून एकहाती लोकसभा आपल्या हातात ठेवली. मात्र, मागील २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले अन् आढळराव पराभूत झाले.

या १९ वर्षांच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या तरी वळसे-आढळराव कधीच फारसे एकत्र दिसले नाही. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच सर्वच समिकरणे बदलून शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये वळसे सहभागी झाल्याने वळसे-आढळराव उघडपणे एका विचारांचे झाले. अर्थात हे सर्व घडवून आणते आहे ते भाजप त्यांच्या स्वार्थाकरीता शिरूर लोकसभा आणि आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ सेफ करुन घेतेय हे अजुन तरी दोघांच्याही समर्थकांच्या लक्षात येत नाही.

Dilip Valse Patil, Shivajirao Adharao Patil Narendra Modi
Amit Shah Pune Visit : अमित शहांच्या दौऱ्यामुळे अनेकांना काही तास राहावे लागले पोलिसांच्या नजरकैदेत !

मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीची (NCP) शकले करुन त्यांच्यातले मोठे गट स्वत:सोबत घेवून भाजपने आता आंबेगाव विधानसभा व शिरुर लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे राहील याची तजविज करुन ठेवली आहे. तूर्तास ज्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात वळसे-आढळराव भांडत होते ते दोघेही आता भाजपसोबतच्या आघाडीत आल्याने लोकसभेसाठी आढळराव आणि विधानसभेसाठी वळसे-पाटील यांचे दोन्ही मतदारसंघ सेफ झालेले आहेत, असेच म्हणता येईल असे सध्याचे पुण्याच्या शिरूर लोकसभा व आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील चित्र आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com