Chandrakant Handore Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress News : राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार!

Sampat Devgire

Chandrakant Handore News : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा गुजरातहूून काढणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी दिली. (BJP and the centre government were scared because of of the india allinace)

शहर काँग्रेसतर्फे (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्याने आयोजित कार्यक्रमासाठी ते नाशिकला (Nashik) आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) जनविरोधी धोरणावर टिका केली.

महाविकास आघाडीत अतिशय चांगला एकोपा आहे. जागावाटपाबाबत कोणताही वाद होणार नाही, कारण आमच्या दृष्टीने जागावाटप दुय्यम तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वेषमूलक विचाराचा पराभव प्राधान्याचा विषय आहे, असे काँग्रेस नेते, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी सांगतिले.

ते म्हणाले, सध्या भाजपकडून देश फोडण्याचे काम सुरू असले तरी, ‘इंडिया’कडून लोकशाही वाचवण्यासह शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठीचे काम करीत आहे. इंडिया आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. भारत, इंडियाचा वाद निर्माण करून लोकांच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे काम करीत असल्याचा आरोप हांडोरे यांनी केला.

या वेळी हांडोरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. केंद्रातील भाजप सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणात सध्या सगळेच पक्ष होरपळून निघाले आहेत. केंद्रातील सरकार राज्यघटनेची तोडफोड करत आहे. न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, इन्कमटॅक्ससारख्या संस्था सध्या केंद्र सरकारच्या तालावर काम करीत आहेत, अशी शंका येते. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. देशात यादवी माजवण्याचे काम भाजप आणि संघाकडून सुरू असल्याचा आरोपही हांडोरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काढली. या यात्रेस मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा काढणार आहे. ही यात्रा गुजरात ते नागालँड अशी काढली जाणार असून, त्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने कितीही विरोध केला तरी येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीचीच सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, माजी महापौर अशोक दिवे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, राहुल दिवे, स्वप्नील पाटील, वसंत ठाकूर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT