MP Supriya Sule Demand : दुष्काळ, आरक्षणाच्या प्रश्नावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा..

NCP News : मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिले होते.
MP Supriya Sule News
MP Supriya Sule NewsSarkarnama

Beed Political News : केंद्र व राज्य सरकार महागाई व बेरोजगारीकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात असून याकडे सरकारचे लक्ष नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (NCP News) एका कार्यक्रमानिमित्त सुळे अंबाजोगाईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

MP Supriya Sule News
MLA Ram Kadam On CM Shinde : मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारालाही पटवले..

राज्यात सध्या दुष्काळ व आरक्षण हे प्रश्न गंभीर बनले आहेत. (MP Supriya Sule) या मुख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र अधिवेशन बोलवावे. या प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून तोडगा काढावा. (Eknath Shinde) तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण दिले त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.

मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते, ते पूर्ण करण्याची मागणीही सुळे यांनी केली. (Beed News) बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शरद पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी काय केले? असा प्रश्न कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ज्यांना या प्रश्नाचे उत्तर पाहिजे त्यांनी मला भेटावे. मी संपूर्ण कामाची यादीच द्यायला तयार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पहिली भेट देणारे नेते शरद पवार आहेत. यावेळी आंदोलनस्थळी ज्या लोकांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या ते लोक गेवराई येथून पाठविण्यात आले होते, असा आरोप आमदार राजेश टोपे यांनी केला. मात्र याचा सूत्रधार कोण? हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com