Shrigonda News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrigonda Politics : श्रीगोंदेकरांसाठी मोठी बातमी ; आता 22 नगरसेवकांच्या हाती कारभार !

Municipal Council News : श्रीगोंदा नगरपरिषदेची प्रभाग संख्या वाढली आहे.

Amol Jaybhaye

Shrigonda News : श्रीगोंदा नगरपरिषदेची प्रभाग संख्या वाढली आहे. प्रभाग संख्या दोनने वाढल्याने नगरसेवकांची संख्या तीनने वाढली आहे. पूर्वी प्रभाग नऊ होते, ते आता 11 झाले आहेत. श्रीगोंदे नगरपरिषदेत पूर्वी 19 नगरसेवक होते. यात तीन नगरसेवक वाढल्याने ते आता 22 होणार आहेत. म्हणजेच, 22 नगरसेवक (Corporator) श्रीगोंदा नगरपरिषदेचे कारभारी असणार आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे प्रादेशिक संचालक राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.

श्रीगोंदा नगरपरिषदेची (Municipal Council) 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 31 हजार 134 होती. आता जाहीर झालेली प्रभाग संख्येत काही वाढीव लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यातून प्रभाग संख्येबरोबर नगरसेवकांची संख्या वाढली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेत सध्या 19 नगरसेवक आहेत. आता नवीन प्रभाग संख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

22 नगरसेवकांमध्ये महिलांसाठी 11 जागा राखीव असतील. यात अनुसूचित जातीसाठी तीन, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाच जागा राखीव असणार आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षित तीन जागांमध्ये दोन महिलांसाठी राखीव असणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पाच जागांपैकी तीन जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

सर्वसाधारणसाठी असलेल्या 14 जागांपैकी सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. दरम्यान, नगराध्यक्षांच्या निवडीबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT