PCMC News : पवार गटाची नवी चाल; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवार अन् जयंत पाटलांची मोर्चेबांधणी

Jayant Patil, Rohit Pawar News : जयंत पाटील आणि रोहित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे.
Jayant Patil, Rohit Pawar, Ajit Pawar News
Jayant Patil, Rohit Pawar, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कथित फूट आणि अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटाने अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडला प्राधान्याने आपल्या रडारवर घेतले आहे. या शहराची जबाबदारी युवा आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) त्यांनी सोपवली असून, तेही वरचेवर दौरे करीत आहेत. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या शहरात खास लक्ष घातले असून, त्यांच्याही भेटी वाढल्या आहेत.

शहराच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ आणि माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी कालच शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांची लगेच पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना पुन्हा सक्रिय होण्याची सूचना केली. राष्ट्रवादीत डावलले गेल्याने आझमभाई हे भाजपमध्ये गेले होते, पण तेथेही तेच झाल्याने ते पुन्हा स्वगृही परतले.

Jayant Patil, Rohit Pawar, Ajit Pawar News
Sharad Pawar News : मोठी बातमी ! ठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता शरद पवारांचाही दसरा मेळावा! 'या' ठिकाणी धडाडणार तोफ

मात्र, आजारामुळे ते राजकारणापासून चार हात दूरच होते. मात्र, त्यांची शहरातील ताकद पाहता त्यांना पुन्हा शहरात लक्ष घालण्याचा सल्ला पाटील यांनी आज दिला. नव्या दमाच्या पक्षाच्या शहरातील यंग ब्रिगेडला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या दौऱ्यात त्यांनी आपल्या गटाबरोबर आलेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला.

आझमभाईंसह इतरही काही ज्येष्ठ नेत्यांच्या पाटील यांनी गाठीभेटी घेत त्यांच्याशी चर्चा केली. शहराध्यक्ष तुषार कामठे त्यांच्या सोबत होते. पक्षफुटीनंतर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटांनी राष्ट्रवादीवर (NCP) दावा केला आहे. त्यावर आयोगात आज सुनावणी झाली.

मात्र, त्याचा निकाल काय येतो, त्यानंतरच त्यात कुठल्या अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का, हे समजेल, या शब्दांत भाजपवर (BJP) त्यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केलेली असून ती त्यांचीच आहे, अन्य कोणाचीही नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले. पक्ष चोरीला जाऊ नये, नाही, तर लोकशाही धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी आयोगाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त या वेळी केली, तर टोल प्रश्नावर या विषयाचा अभ्यास नाही, असे सांगत त्यांनी तो प्रश्न टोलवला.

Edited by : Amol Jaybhaye

Jayant Patil, Rohit Pawar, Ajit Pawar News
Dhananjay Munde News : पालकमंत्री होताच मुंडेंचा धडाका; 'वैद्यनाथ'च्या 286 कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com