NCP agitation at Pune Road Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NCP News: सरकारने राज्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय केले

Sampat Devgire

Nashik Political News: राज्यातील सरकारकडे लोकहिताचे नव्हे तर जनतेला उध्वस्त करण्याचे धोरण आहे. त्याची प्रचिती सध्या सर्व युवकांना येत आहे. हे सरकार सर्व युवकांना कंत्राटी नोकर करून त्यांचे भविष्य संकटात लोटत आहे, त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. (Maharashtra Government have no policy for people of the state)

राज्यातील (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारने राज्य सरकारमधील पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा आदेश काढला आहे. त्या आदेशाची राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) होळी केली.

राज्य सरकारने ६ सप्टेंबरला निर्णय काढून सर्व शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असून, त्यासाठी खासगी नऊ संस्थांना नोकरभरतीचे कंत्राट दिले.

त्यांचा हा निर्णय राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारा हा शासन निर्णय असून, युवकांचे भविष्य अंधारात ढकलणारा निर्णय आहे. राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नांदूर शिंगोटे (सिन्नर) येथेनाशिक- पुणे महामार्गावर रास्ता रोको करून कंत्राटी भरती जीआरची होळी करण्यात आली.

यावेळी राज्य सरकारचा करून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, शिवराम शेळके, संजय शेळके, राजेंद्र दराडे, सोमनाथ नवले, गणी सय्यद, अशोक गवारे, ऋषिकेश शेळके, ओम शेळके, बाळासाहेब शेळके, सुरेश शेळके, ऋतिक गोसावी, योगेश बैरागी, प्रतिक घुगे, संकेत शेळके, वैभव शेळके, महेश सानप, रवींद्र घुगे, जीवन ढाकणे आदी उपस्थित होते. या निषेध आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने जीआर काढला आहे. तो अतिशय घातक आहे. त्यामुळे विद्यार्थी, नुकतेच रुजू झालेल्या कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंत्राटीकरणाचा निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा जनता सरकारला धडा शिकवेल.

-कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा अध्यक्ष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT