Nashik Shivsena News : भेटीगाठी म्हणजे दबावाचे राजकारण नसते!

I am loyal with Shivsena and in Party only-शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठींचे केले समर्थन
Babanrao Gholap
Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Babanrao Gholap News : मी शिवसेनेचाच आहे. शिवसेना सोडण्याचा कोणताही विचार माझ्या मनात नाही. माझ्याबाबतच्या सर्व राजकीय चर्चा निराधार आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी दिले आहे. (Meeting with alliance leaders is not at all pressure tacties)

गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री बबनराव घोलप (Nashik) यांनी आपण कोणतेही दबावाचे राजकारण (Mahavikas Aghadi) करीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Babanrao Gholap
Bhujbal v/s Gholap Politics : बबनराव घोलप यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही!

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेअंतर्गत राजकीय वादातून त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा फेटाळला होता.

यासंदर्भात घोलप यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली होती. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी घोलप यांची भेट होणार होती. मात्र, ही भेट होऊ शकली नसल्याने घोलप नाराज असल्याची चर्चा पसरली होती.

घोलप यांनी मुंबईत चर्मकार संघाचा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी नुकतीच बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Babanrao Gholap
NCP Politics in Kolhapur : ...तर जिल्हा बँकेत काय झाले ते सगळं बाहेर काढू : मुश्रीफांना इशारा कुणाचा ?

या पार्श्वभूमीवर घोलप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा शिवसेनेशी संपर्क आहे. त्यामुळे या नेत्यांची भेट घेतल्याचा वेगळा अर्थ कोणीही काढू नये. मी शिवसेनेतच आहे. यामध्ये कोणतेही दबावाचे राजकारण नाही.

Babanrao Gholap
Amruta Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांविषयी अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान; म्हणाल्या, '' हे मला लग्न झाल्यापासून...''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com