Police inspecting Eknath Khadse’s Jalgaon residence after a major theft of gold rings and cash. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath khadse : एकनाथ खडसे यांच्या घराच्या चोरीतही राजकीय हात? 'ते' पेन ड्राईव्ह आणि सीडीही चोरीला!

Eknath khadse Political Allegations : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी मंगळवारी चोरी झाल्याचे उघड झाले असून या चोरी मागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Sampat Devgire

  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरात मंगळवारी चोरी झाल्याची घटना घडली.

  2. खडसेंनी या चोरीमागे राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  3. या घटनेमुळे राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. या चोरीमागे वेगळेच राजकीय षडयंत्र असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळे ही चोरी चर्चेचा विषय ठरली आहे. मुक्ताईनगर येथील शिवराम नगर या उच्चभ्रू वस्तीत माजी मंत्री एकनाथ खडसे मुक्ताई बंगल्यात राहतात. मंगळवारी त्यांच्या घरी चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

माजी मंत्री खडसे यांच्या घरातून झालेल्या चोरीत सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू ३५ हजार रुपये रोख असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या चोरीनंतर खडसे यांनी घराची तपासणी केली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

चोरांनी राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या आणि माजी मंत्री खडसे सातत्याने उल्लेख करीत असलेल्या त्या सीडी आणि पेन ड्राईव्ह देखील चोरून नेले आहेत. याची खडसे यांनीच माहिती दिली असून त्यांनी, माझ्या घराची रेकी करून अतिशय पद्धतशीरपणे रचलेल्या कटातून ही चोरी झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

चोरीला गेलेल्या सीडींपैकी सहा सीडी अद्यापही शिल्लक आहेत. हे राहिलेले कागदपत्र आणि सीडी मी पोलिसांना दाखवणार आहे. पोलिसांनी याचा तपास करून या चोरीचा छडा लावावा असेही ते म्हणाले. ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्यातरी सांगण्यावरून झाली असावी का? असा संशय त्यांनी व्यक्त केला. मी आता कोणाचे नाव घेऊ शकत नाही. मात्र माझा संशय देखील तेवढाच बळकट आहे.

माझ्या घरी झालेल्या चोरीत केवळ चोरी हा उद्देश नसावा. घरातील कागदपत्र, पेन ड्राईव्ह आणि सीडी चोरून नेण्याच्या मुख्य उद्देशाने हे प्रकरण घडले असावे, असाही दावा खडसे यांनी केला आहे. खडसे यांच्या या दाव्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खडसे यांच्या घरी झालेली चोरी हा देखील राजकीय आरोप आणि प्रत्यारोपाचा विषय बनला.

काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या स्नुषा आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्यानंतर काही दिवसांनीच खडसे यांच्या घरी घरफोडी झाली. याचा तपास सुरू असतानाच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आणि जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कारकिर्दीला धोका पोहोचतील अशा सीडी आणि पेन ड्राईव्ह देखील चोरीला गेले आहेत. या चोरी मागे राजकीय नेता तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

FAQs :

1. चोरीची घटना कुठे घडली?
ही घटना राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या घरात घडली.

2. एकनाथ खडसे यांनी काय दावा केला आहे?
त्यांनी या चोरीमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

3. खडसे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.

4. या घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
पोलिसांनी तपास सुरू करून गुन्हा नोंदवला असून चौकशी सुरू आहे.

5. या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
खडसेंच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT