Eknath Khadse : धक्कादायक, पेट्रोलपंपानंतर एकनाथ खडसेंच्या घरावरही चोरट्यांचा डल्ला ; सगळी कपाटं फोडून अंगठ्या, रोकड लंपास

Eknath Khadse house theft case shocks Jalgaon : काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यानंतर खडसेंच्या घरातही चोरट्यांनी चोरी केली आहे.
Police inspecting Eknath Khadse’s Jalgaon residence after a major theft of gold rings and cash.
Police inspecting Eknath Khadse’s Jalgaon residence after a major theft of gold rings and cash.Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच खडसेंच्या सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. चोरट्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत लूट केली होती. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे.

दिवाळी असल्याने एकनाथ खडसे हे बाहेरगावी होते. त्यांच्या या घरात एक सुरक्षारक्षक असतो. पण तोही सुट्टीवर होता. चोरट्यांनी हीच संधी साधत एकनाथ खडसे यांच्या घराचे मध्यरात्री कुलूप तोडून आत शिरले. चोरट्यानी सुमारे सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास केल्याची माहिती आहे.

Police inspecting Eknath Khadse’s Jalgaon residence after a major theft of gold rings and cash.
Nashik Crime : आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या टोळीवर मोक्का, निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना मोठा धक्का

यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. खडसे म्हणाले, रात्री नेमकी केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही पण बंगल्यातील सर्व रूमचे लॉक तोडून चोरी केलेली आहे. माझ्या रूममध्ये 35 हजार रुपये होते. तसेच ५-५ ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहे. खाली आमचे नातेवाईक राहत होते. त्यांचे देखील पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे, रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे अशी माहिती खडसेंनी दिली.

Police inspecting Eknath Khadse’s Jalgaon residence after a major theft of gold rings and cash.
Raksha Khadse : मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचे नाशिक कनेक्शन, 6 जणांना अटक

खडसेंनी यावेळी पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले. जळगाव जिल्ह्यात चोरांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझीच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ काढतात. पोलिसांना आणि सरकारला घटनेचे गांभीर्य नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com