Traffic jammed in Thane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mumbai-Nashik Traffic : विधीमंडळात चर्चा...आज झाली दुप्पट वाहतूक कोंडी!

सरकारनामा ब्युरो

Nashik Traffic News : मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येने नाशिक, मुंबई, ठाण्याचे नागरिक प्रचंड त्रस्त आहे. त्याचा फटका अनेक राजकीय नेत्यांना देखील बसतो आहे. याबाबत मंगळवारी विधानसभेत चर्चा झाली, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दुप्पट वाहतूक कोंडी दिसून आली. मंत्री यावर काही उपाय करणार की नाही. (Nashik-Mumbai distance of three hours takes ten hours due to Traffic issue)

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाशिक-मुंबई (Mumbai) महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा घडवली होती. याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांसह अनेक नेते आता सरकारमध्ये असल्याने यावर ते गप्प असल्याची टिका त्यांनी केली होती.

मुंबई आणि ठाण्यात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. विशेषत: मुंबई-नाशिक महामार्गावर असणारी वाहतूक कोंडीची समस्या ही पाचवीलाच पुजली आहे. या मार्गावर फक्त दिवसाच नाही तर रात्रीदेखील प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला समोरं जावं लागत आहे.

या वाहतूक कोंडीला विविध कारणं आहेत. रस्त्यावरील खड्डे हे त्याचे एक प्रमुख आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी निर्माण होते. आज तर या वाहतूक कोंडीची हद्दच झाली. कारण मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवाडा ते माणकोली दरम्यान तब्बल चार ते पाच तास गाड्या अडकून पडल्या. त्याचा वाहनचालक, प्रवासी यांच्यावर प्रचंड ताण पडला. ते अक्षरशः वैतागले.

मंत्र्यासाठी विमाने

या कोंडीचा अनेक राजकीय नेत्यांना फटाक बसतो आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन बुजबळ, जळगावचे गुलाबराव पाटील, गिरीष महाजन, अनिल पाटील तसेच नंदूरबारचे विजय पाटील हे तीन मंत्री आहेत. यातील बहुतांश मंत्री हेलीकॉप्टर तसेचस विमानाचा वापर करीत असल्याने त्यांना या कोंडीचा त्रास होत नाही. या कोंडीच्या समस्येवर प्रशासन, सरकार काही उपाययोजना करील की नाही? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT