Monsoon Session News: तुम्ही दयावान, मी दयावान, सीएम त्यापेक्षाही दयावान!

Legislative council's speaker Neelam Gorhe question on Minister`s Answer-सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नावरील अनिल परब यांच्या लक्षवेधीवरील चर्चेत सभापतींनी टोचले कान
Eknath Shinde & Neelam Gorhe
Eknath Shinde & Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Anil Parab News : वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नावरशिवसेनेचे अनिल परब यांच्या लक्षवेधीवर विधानपरिषदेत दिर्घकाळ चर्चा झाली, मंत्र्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे शेवटी अस्वस्थ झालेल्या सभापती मंत्र्यांना म्हणाल्या, `तुम्ही दयावान, त्यापेक्षा मी दयावान आणि सीएम त्यापेक्षाही दयावान`.

शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत (Maharashtra Government) कर्मचाऱ्यांच्या सहकारी संस्थेला जागा कधी देणार याबाबत लक्षवेधी सादर केली होती. त्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले.

Eknath Shinde & Neelam Gorhe
Bawankule On Amit Thackeray: अमित ठाकरेंनी टोल नाक्यावर आंदोलन करायला हवं होतं; बावनकुळेंनी 'मनसे'ला पुन्हा डिवचलं

अनिल परब गेले वीस वर्षे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत भूखंड मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहे. यावर त्यांनी काल लक्षवेधी सूचना दिली होती. त्यावर विविध सदस्यांनी उपप्रश्न केले. दिर्घकाळ चर्चा झाली. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जागा देण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत. ते खुप पॉझीटीव्ह आहेत. कोरीयन कंपनी या जागेचा विकास करीत आहे. त्यांनी राज्य शासनाला किती जमीन मिळणार आहे, याचा तपशीलदिला की यावर निर्णय घेऊ असे सांगितले. ठोस घोषणा मात्र प्रयत्न व सदस्यांनी मागणी करूनही मंत्री देत नव्हते.

आमदार परब म्हणाले, एखाद्या आमदाराचे स्वप्न असते की, त्याच्या कारकिर्दीत एक तरी मनासारखे काम व्हावे. या प्रश्नावर वीस वर्षे मी पाठपुरावा करीत आहे. भाई गिरकर, विनोद तावडे यांसह शविसेना, भाजप युतीच्या नेत्यांनी त्यासाठी आंदोलन केले आहे. मी मंत्री असताना हा निर्णय घेतला होता. मात्र सरकार गेले. तेव्हा आता तरी याबाबत ठोस उत्तर द्या, असा आग्रह धरला.

Eknath Shinde & Neelam Gorhe
Pradeep Kurulkar News : कुरुलकरांकडून दोन महिलांवर लैंगिक अत्याचार; ATS'च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

यावेळी भाई गिरकर यांनी देखील त्यांची बाजू लाऊन धरली. सचिन अहीर, प्रवीण दरेकर त्यांच्या मदतीला धाऊन आले. मात्र मंत्री अपेक्षीत उत्तर देत नव्हते. शेवटी सभापती गोऱ्हे यांचाही पारा चढलाच. त्या म्हणाल्या मी देखील गेले १५-१६ वर्षे या प्रश्नावर झाली ऐकते आहे. तुम्ही दयावान, त्यापेक्षा मी दयावान, सीएम त्यापेक्षाही दयावान. तुम्ही दयावान,कृपाळू सर्वच आहात, मात्र शासकीय कर्माचऱ्यांना घरे देण्यासाठी त्या योजनेत सामावून घेण्याचे धोरण ठेवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com