Suresh Prabhu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Co-operative News : समाजाला सहकार क्षेत्राविषयी आदर राहिलेला नाही

There was not that respect regarding now a days towards Cooperative sector-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले.

Sampat Devgire

Suresh Prabhu news : समाजाला सहकार क्षेत्राबद्दल मोठा आदर होता. बदलत्या काळातही समाजाला सहकार क्षेत्राची गरज आहे. मात्र, समाजामध्ये सहकाराविषयी पूर्वीसारखा आदर राहिलेला नाही. त्यामुळे समाज व सहकारात दरी निर्माण झालेली आहे, असे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी सांगितले. (Maharashtra state co-operative banks association awards given by Suresh Prabhu)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या पुरस्काराचे वितरण आज नाशिक (Nashik) येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी सहकाराचे महत्त्व विषद केले.

प्रभू म्हणाले की, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहाेचणारे एकमेव क्षेत्र हे सहकार आहे. ते सर्व घटकांशी जोडणारे असल्याने त्यात समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे सहकारात काम करताना आपली नेमकी भूमिका समजून घेण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. हे बदल आत्मसात न केल्यास संस्था कालबाह्य होतील. त्यासाठी काळाप्रमाणे सहकार क्षेत्राने बदलण्याची आवश्यकता आहे. तरुणाईची संख्या मोठी आहे, त्यांच्या हातात मोबाईलच्या माध्यमातून जग आले आहे. या तरुणाईला सहकार क्षेत्राशी जोडण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे.

सहकारी संस्थांनी आपली मूलतत्त्वे न सोडता आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवीन विचार घेऊन सहकारी संस्थांनी समाजापुढे जावे. यात मूळ ग्राहकाला विसरता कामा नये, असा मंत्रही श्री. प्रभू यांनी दिला.

या वेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, वसंतराव घुईखेडकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT