Dhule NCP News : मराठा आरक्षणाचा प्रश्न अजित पवार हेच सोडवतील

NCP says, Maratha community will get leagle reservation-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट सत्तेत असला तरीही मराठा आंदोलनाच्या बाजूने राहील.
Suraj Chavan
Suraj ChavanSarkarnama

NCP News : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक दिवस चर्चेत आहे. याबाबत आम्ही त्यांच्या मागणीशी सहमत आहोत. कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल. हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सोडवतील, असा जनतेला विश्वास असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला. (Dy. CM Ajit Pawar will solve the issue of Maratha reservation)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी काल धुळे (Dhule) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनचा ताबा घेतला. मराठा (Maratha) आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Suraj Chavan
Dhule Shivsena News : देवेंद्र फडणवीस यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला!

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला आहे.

ते पुढे म्हणाले, की २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली. शहरासाठी कुणाल पवार, तर ग्रामीणची जबाबदारी सुमीत पवार, आशिष अहिरे यांच्यावर आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादीची वाटचाल कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा घेणे, संघटन मजबुतीकरणासाठी आढावा घेत आहेत.

Suraj Chavan
Jalna News | Arjun Khotkar जालन्याकडे रवाना, जरांगे पाटील उपोषण सोडणार ? | Maratha Protest

ते पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असली, तरी एक पक्ष म्हणून आम्ही सरकारकडे राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करू. तरुणांच्या हाताला काम मिळविण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा होईल.

आगामी निवडणुकीत कोणती जागा कोणी लढवावी, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. ज्यांच्याकडे शहरातील राष्ट्रवादी भवनाची कागदपत्रे असतील, त्यांच्याकडे भवनाचा ताबा आपोआपच राहील, अशी पुष्टी श्री. चव्हाण यांनी जोडली. राज्यपातळीवर आमदार, खासदार निवडणुकीत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकतर तरुणांना तिकीट मिळावे, यासाठी आग्रह राहील. आंदोलनांपेक्षा मंत्रालयातून प्रश्न सोडविण्यावर भर आहे. धुळ्याचा विकास ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.

Suraj Chavan
Crops Insurance Politics : पीक विमा अग्रीमवरून बीडमध्ये श्रेयवाद ठिणगी..; शेतकरी मात्र मदतीच्या प्रतिक्षेतच

या वेळी अर्जुन टिळे, किरण शिंदे, सारांश भावसार, किरण पाटील, ज्ञानेश्वर भामरे, इर्शाद जहागीरदार, पोपटराव सोनवणे, कैलास चौधरी, सत्यजित शिसोदे, कुणाल पवार, सुमीत पवार, आकाश शिंदे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com