Grampanchayat Candidates submites forms
Grampanchayat Candidates submites forms Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`या`ग्रामपंचायतींत निवडणुकीसाठी मिळेना उमेदवार

Sampat Devgire

चिमठाणे : शिंदखेडा (Dhule) तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या (Grampanchayat) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी अकरा ग्रामपंचायतींच्या लोकनियुक सरपंचपदासाठी ११ उमेदवारी अर्ज, तर ११ ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बारा ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. (12 village Grampanchayat election is On But no candidature yet)

उद्या (ता.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या गावांत उमेदवारी अर्ज दाखल होतो की नाही याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नागरिकांनी निवडणुकीकडे पाठ का फिरवली याची कारणे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

धुळे तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीदेखील चिमठाणे, जोगशेलू, साहूर, कलमाडी, पिंप्राड, अमळथे, नेवाड, सतारे, गोराणे, पाष्टे, विटाई व वणी या ग्रामपंचायतींचे अद्यापही एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तिसऱ्या दिवशी नरडाणा, वरसूस येथे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती.

बुधवारी सरपंचपदासाठी ११ अर्ज दाखल झाले असून, ६३ अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. आतापावेतो सरपंचपदासाठी १९ अर्ज, तर सदस्यपदासाठी ७० अर्ज दाखल झाले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असून, आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार आहे.

मुहूर्ताची लगबग

सरपंच थेट मतदारांमधून निवडून द्यावयाचा असल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस आहे. त्यामुळे लहान-मोठी प्रत्येक बाब पारखून घेतली जात आहे. मुहूर्तावर अर्ज भरण्याकडे बहुसंख्य इच्छुकांचा कटाक्ष असून, त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषी, पुरोहितांकडे मुहूर्त काढण्यासाठी गर्दी होत आहे. थाळनेर गावातून सदस्यपदाचे तब्बल २४ अर्ज दाखल झाल्यामुळे तेथे किती पॅनल्स लढतीत असतील याबाबत चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT