Narendra Patil at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : नरेंद्र पाटील म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवायचा आहे!

This is the important fight for Maratha till we get reservation-मराठा आरक्षणाला पाठींबा मिळविण्यासाठी राज्यातील खेड्यांत जाऊन प्रबोधन करण्याचा निर्धार...

Sampat Devgire

Nashik Maratha Agitation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही अतिशय महत्त्वाची व गंभीर मागणी आहे. आता त्याबाबतचा लढा टोकाला नेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आपण थांबायचे नाही, असा निर्धार अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते, आमदार नरेंद्र पाटील यांनी केला. (Maratha mahasangh leader Narendra Patil meets Maratha workers)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिक (Nashik) येथे गेल्या सोळा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मराठा (Maratha) महासंघाचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज या आंदोलकांची भेट घेतली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी नाशिकच्या मराठा साखळी उपोषणात उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला व आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. पाटील यांनी आता आरक्षण मिळेपर्यंत थांबायचे नाही, ही समाजाची मानसिकता झाली. राज्य शासन या भावना समजून घेईल, अशी अपेक्षा आहे.

नाशिक जिल्हा सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण नाशिक येथे सुरू आहे. या आरक्षण साखळी उपोषणाचा आज सोळावा दिवस होता. आज अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन त्याला पाठिंबा दिला आहे.

आज दुपारी बाराला प्रहार दिव्यांग संघटना, तसेच भारत राष्ट्र समिती या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणस्थळी येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला व आपल्या भावना व्यक्त केल्या.

हरिभक्त पारायण शिवव्याख्याते श्री कृष्णाजी महाराज धोंडगे दुगावकर, पर्यावरण मित्र शिवाजी भाऊ धोंडगे व वृक्षमित्र भारत पिंगळे यांनी उपोषणस्थळी येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मराठा समाजाचा आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी प्रत्येकाने या साखळी उपोषणात आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT