Balasaheb Thorat & Dipak pandey News, Dipak Pandey on Balasaheb Thorat
Balasaheb Thorat & Dipak pandey News, Dipak Pandey on Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'थोरात माझे आदर्श मात्र मी माझ्या पत्रावर ठाम'

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे (Dipak Pandey) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत नाशिकच्या (Nashik) महसूल विभागाच्या कारभाराबाबात मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb-thorat) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिस आयुक्त पांडेंनी थोराताकडे दिलगिरी व्यक्त करत ते माझे आदर्श असल्याचे सांगितले आणि माझा हेतू कुणाचे मन दुखावण्याचा नाही, असे सांगत कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आपण काहीच चुकीचे केेले नसून मी माझ्या पत्रावर अजूनही ठाम आहे, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी दिली आहे. (Dipak Pandey on Balasaheb Thorat)

पोलिस आयुक्त पांडेंनी थोरातांना आपले आदर्श म्हणत माझा हेतू कुणाचे मन दुखावण्याचा नाही. मात्र तरीही महसूल विभागातील लेटरबाँम्बमुळे कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, मी माझ्या पत्रावर अजूनही ठाम आहे, असे म्हटले आहे. कारवाईची भिती वाटतं नाही का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने पांडे यांना विचारल्यावर ते म्हणाले की, मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या अनुभवानुसार मी हे पत्र पाठविले आहे. माझ्या रूलमध्ये हा विषय बसतो. त्यामुळे लोकहितार्थ हे पत्र पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी प्रतिक्रिया देतांना थोरात म्हणाले की, आयुक्त पांडे यांना एखाद्या विभागाबद्दल वाटतं तर ते स्पेसिफिक मांडणी करू शकतात. मात्र त्यांनी मिडीयाकडे जायची गरज नव्हती. त्याच्या पत्राची भाषा आक्षेपार्ह आहे. एखादी गोष्ट चुकत असली तर अधिकाऱ्यांना शिक्षा देतो. पण कायद्याचे राज्य असताना अशी भाषा वापरणे योग्य नाही, अशा शब्दात थोरातांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारख्या स्फोटकांप्रमाणे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होतो आणि तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हेच भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य जनतेचा छळ करत पैशांसाठी त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप पांडेंनी पोलिस महासंचालकास पाठवलेल्या आपल्या पत्रातून केला होता. तर महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेतले जावेत, अशी मागणीही पांडेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT