Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena MLA News: `ते` आमदार रात्रभर झोपलेच नाही?...

Sampat Devgire

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होईल. या सोळा आमदारांत जळगावच्या दोन आमदारांचा समावेष आहे. काय निकाल लागतो, आपण अपात्र ठरल्यास काय होणार? या चिंतेने या आमदारांना रात्रभर झोपच लागली नाही, असे वातावरण होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (Two MLA from Jalgaon inclueded in sixteen MLAs)

शिवसेना (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या सोळा आमदारांनी भाजपच्या (BJP) मदतीने पक्ष सोडला. ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत प्रारंभी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. या आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) निकाल देणार आहे.

राज्यातील ज्या सोळा आमदारांना अपात्र ठरवावे अशी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यात जळगावच्या लता सोनवणे (चोपडा) आणि चिमणराव पाटील (एरंडोल) यांचा समावेष आहे. जळगावचे सर्व पाच आमदार शिंदे गटात गेले आहे. त्यात गुलाबराव पाटील हे मंत्री झाले. मात्र तुर्त ज्या खटल्याचा निकाल आहे, त्यात सोळा आमदारांत दोन आमदार आहेत. हे सोळा आमदार अपात्र ठरल्यास त्यात मुख्यमंत्री एकनात शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येईल.

मुख्यमंत्री अपात्र ठरले तरीही राज्यातील शिंदे गट व भाजपचे सरकार कोसळणार नाही असा दावा राजकीय नेते करतात. परंतु अपात्र ठरणाऱ्या आमदारांची राजकीय कारकिर्द मात्र संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी करता येणार नाही. अशा स्थितीत राज्यातील सरकार तरले तरीही या आमदारांच्या पदरी मात्र निराशाच येईल. अशा स्थितीत बंडखोरी करून मतदारसंघातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली, त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे या आमदारांचे दुःख आहे.

सर्वोच्च न्यायालय याबाबत आज निर्णय देणार आहे. त्यामुळे सबंध राज्य सरकारमधील मंत्री, नेते आणि मंत्रालयातील अधिकारी देखील कालपासून अस्वस्थ होते. अनेकांनी आपले फोन स्विच ऑफ करून ठेवले होते. मंत्र्यांनी तर निवडक व ओळखीच्या लोकांचेच दुरध्वनी घेतले. याची माहिती सर्वच बंडखोर आमदारांना कळत होती. त्यामुळे त्यांना चैन पडेल अशी स्थिती नव्हती. त्यामुळे रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही, असे त्यांच्या निकटवर्ती सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT