Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`जलजीवन`ला आडवे येणाऱ्यांचा सत्यानाश होईल!

Sampat Devgire

नंदुरबार : विरोधक (Opposition) आमच्यावर ऊठसूट आरोप करीत आहेत. भविष्यातदेखील आरोप होणारच आहेत. आमच्यावर गद्दार, (Rebel) धोकेबाजीचे शिंतोडे उडविण्यात येत आहेत; परंतु आपण विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. जलजीवन मिशन योजनेत (Jaljeevan mission scheme) जे आडवे येतील त्यांचा सत्यानाश होईल, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली. (Water supply minister Gulabrao Patil criticise opponent)

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाहीर सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून शनिमांडळमध्ये दोन वर्षांत पाणी आणण्याच्या प्रयत्न करण्यात येईल. विरोधक आमच्यावर ऊठसूट आरोप करीत आहेत. धोका, गद्दारी केल्याची टीका करण्यात येत आहे. मग पश्‍चिम बंगालमध्ये पडलेल्या धाडीत २७ कोटी पकडले गेले. त्या वेळी पैसे भरण्यासाठी टेम्पो लागला. मग ५० कोटींसाठी ट्रक लागायला पाहिजे होता.’’

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सयाजीराव मोरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी व्यासपीठावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, धडगाव नगरपंचायतीचे धनसिंग पराडके, जिल्हा परिषद सदस्य जागृती मोरे, पंचायत समिती सभापती माया माळसे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजीराव मोरे, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, सरपंच वर्षा मोरे, पंचायत समिती सदस्य कमलेश महाले, छाया पवार, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे, मुन्ना पाटील, तिलालीच्या सरपंच स्मिता पाटील आदी उपस्थित होते.

योजनेला लोकप्रतिनिधींचा विरोध हे दुर्दैव

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, की विकासाचे काम करीत असताना नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. दुर्दैवाने शनिमांडळ योजनेला काही लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आला; परंतु सततच्या पाठपुराव्यामुळे योजना मंजूर करून आणली. तापी बुराई योजनेसाठी प्रयत्न करण्यात यावेत. पाण्यात कधीही राजकारण केले नाही. होलतर्फे हवेली गाव ग्रामीण भागात येत असतानासुद्धा पालिकेकडून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT