Balasaheb Thorat on BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat on BJP : सोलापूरकर-कोरटकर-कोश्यारींचा संदर्भ देत भाजपला 'एपस्टीन फाईल'ची टोचणी; सपकाळांसाठी थोरातांची मैदानात एन्ट्री

Tipu Sultan–Shivaji Maharaj Row : Balasaheb Thorat Targets BJP Over Epstein File : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरले असून, भाजपला एपस्टीन फाईलवरून अंगावर घेतलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political controversy : टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची समकक्ष असल्याच्या उल्लेखावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भाजपने चांगलंच घेरलं आहे. काँग्रेस देखील भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे.

आता हर्षवर्धन सपकाळांसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मैदानात उतरले असून, थेट 'एपस्टीन फाईल्स'ला हात घालत, भाजपला डिवचलं आहे. थोरातांनी 'एपस्टीन फाईल्स'चा नुसता उल्लेख करून, भाजपला डिवचलं नाही, तर अंगावर घेतलं आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा लढला, असे सपकाळ यांनी म्हटले. पण, भाजपकडून विधानाचे वेगळ्या कारणांसाठी अन् कशावरून तरी लक्ष हटवण्यासाठी राजकारण केलं जात आहे."

भाजपला (BJP) छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न करताना, भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, यांच्याबाबत भाजपची भूमिका काय? सिंधुदुर्ग इथं महाराजांचा पुतळा पडला, त्याचं काय? भ्रष्टाचाराची चौकशी केली का? असा प्रश्न केला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रद्धा असल्याचा खोटा प्रयत्न भाजपने करू नये, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी हर्षवर्धन सपकाळ यांची पाठराखण केली. याचवेळी थोरातांनी 'एस्पटीन फाईल्स'चा उल्लेख करत भाजपला जोरदार डिवचलं.

'एफस्टीन फाईल्स'ने देशातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केल आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला. 'एफस्टीन फाईल्स'मुळे अमेरिकेसोबत करार करावा लागला. 'एफस्टीन'शी काही संबंध नसताना, आमच्या शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, असाही टोला थोरातांनी भाजपला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT