Amravati Judges Theft Case : पाच न्यायाधीशांच्या घरांवर चोरांचा धाडसी डल्ला; बच्चू कडूंचा टोला, 'हिंदूच नाही, न्यायाधीशही खतऱ्यात!', फडणवीसांना थेट सवाल

Amravati Judges Theft Case: Bachchu Kadu Targets CM Devendra Fadnavis : अमरावती इथं पाच न्यायाधीशींच्या निवासस्थानी झालेल्या चोरीवरून बच्चू कडू यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
 Bachchu Kadu Targets CM
Bachchu Kadu Targets CMSarkarnama
Published on
Updated on

Amravati crime news : अमरावती जिल्ह्यातील कांतानगर इथल्या न्यायाधीश निवास स्थानाला चोरांनी टार्गेट केलं. पाच न्यायाधीश अन् चार कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी केली. या चोरीमुळे अमरावतीसह राज्यातील न्याय व्यवस्थेमध्ये खळबळ उडाली आहे. चोरांची ही चोरी, पोलिसांना आव्हान ठरली आहे.

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपचे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हिंदूंबरोबरच, न्यायाधीश देखील खतरे मै हैं,' असा टोला कडूंनी फडणवीसांना लगावला आहे.

अमरावती (Amravati) शहरातील कांतानगरमध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची निवासस्थान आहे. इथं चोरांनी काल मध्यरात्री चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांवर हात सफाई केल्याची माहिती समोर येत आहे. न्यायाधीश आणि कर्मचारी हे सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी असल्याचे हेरून ही चोरी झाली आहे. काही न्यायाधीशांच्या घरांना चोरांनी बाहेर कडी घातली.

न्यायाधीशांच्या निवासस्थान, पोलिस सुरक्षा व्यवस्था असते. तरी चोरी कशी झाली? चोरीच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी कुठे होते? काय करत होते? यामुळे चोरांच्या धाडसी चोरी, तर बंदोबस्तावरील गाफील पोलिसांचा कारभार चर्चेत आला आहे. पोलिसांच्या या कारभारावरून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 Bachchu Kadu Targets CM
Harshwardhan Sapkal : सपकाळांचं तोंड काळ करा, दोन लाख देतो! भाजप आमदारांचा संताप, बाळासाहेबांचा उल्लेख करत राऊतांवर घणाघात

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी, चोरांनी आता न्यायाधीशाच्या घरावर दरोडे टाकायला सुरवात केली आहे. त्यांनी मंत्र्यांच्या घरावर दरोडे टाकले पाहिजे. तसंही हे सरकार शेतकऱ्यांच्या घरावर रोज दरोडे टाकत आहे. न्यायाधीशाच्या घरावर दरोडा पडतो, त्याची बातमी होते. पण रोज शेतकर्‍यांच्या घरावर दरोडा पडते त्याचं काय? असा सवाल केला.

 Bachchu Kadu Targets CM
ATS Raid in Muslim Area : ‘ATS’चा मोठा सर्जिकल स्ट्राईक? बहुसंख्य मुस्लिम भागात 10-12 ठिकाणी छापे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त?

वानरसेना केव्हा काम करणार?

'हिंदू खतरे मे हैं अशी आरोळी ठोकली जाते, आता न्यायाधीश देखील खतरे मे आले आहे. 'बटेंगे तो कटेंगे' म्हटलं जातं. परंतु आता न्यायाधीशांवरच बटण्याची वेळ आली आहे. देवाभाऊ तुमची वानरसेना केव्हा काम करणार? तुमच्याकडे गृह खातं आहे,' असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला.

दरोडेखोर खुलेआम फिरतात

'न्यायाधीशाच्या घरी जर चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय राहिलं. मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, तुम्ही गृहमंत्री आहेत आणि देवाभाऊ इथं दरोडेखोर खुलेआम फिरते आहे. देवाभाऊ तुमचं नाव आहे. पण देवासारखं राज्य येणार कधी? तुमच्याकडून अपेक्षा आहे,' असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com