Anita Bhamre News, Nashik News, Shivsena News, Eknath Shinde News
Anita Bhamre News, Nashik News, Shivsena News, Eknath Shinde News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

५० आमदार खरेदीसाठी गॅसची ५० रुपये दरवाढ?

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील (Maharashtra) महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) ५० आमदार फोडण्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची डील करण्यात आल्याची चर्चा आहे. आमदारांवर झालेला हा खर्च वसुल करण्यासाठीच केंद्र सरकारने (centre Government) सामान्य गृहिनींच्या डोक्यावर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रूपये वाढीचे ओझे लादले आहे. अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (NCP) शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली.(LPG cylinder price increased is another burden for ordinery people)

सौ. भामरे म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम रितीने कारभार करीत होते. मात्र भाजपला हे सहन होत नव्हते. त्यातूनच पैशाचे प्रलोभन दाखवून महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेनेचे ४० व १० अपक्ष असे ५० आमदार प्रत्येकी ५० कोटी रूपयांची डील करून भाजपने फोडले, असे बोलले जाते. या बंडखोर आमदारांवर झालेला अडीच हजार कोटींचा खर्च वसूल करण्यासाठीच सर्वसामान्य, गरीब जनतेच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ केली.(Anita Bhamre News in Marathi)

त्या पुढे म्हणाल्या, प्रथम गॅस सिलेंडर वरील अनुदान केंद्र सरकारने बंद केले. त्यानंतर तेल कंपन्याचा फायदा करत गोरगरीब महिलांच्या पोटावर लाथ मारण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. आजमितीस गॅस सिलेंडरची किंमत ११०० रुपयापर्यंत जाऊन पोहोचली. भारतीय जनता पक्षात देखील महिला भगिनी काम करतात किमान त्यांनी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना याबाबतीत सल्ला द्यावा.

वारंवार आंदोलन करूनही केंद्र सरकार दखल घ्यायला तयार नसेल तर सर्व सामान्य महिलांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT