दादा भुसेंच्या बैठकीत मोबाईल स्वीच ऑफ अन् कडेकोट बंदोबस्त

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मतदारसंघात आलेल्या दादा भुसे यांनी कार्यकर्त्यांच्या मोबाईलचाही धसका घेतला.
Dada Bhuse News, Shivsena news, Malegaon news, Eknath Shinde News
Dada Bhuse News, Shivsena news, Malegaon news, Eknath Shinde NewsSarkarnama

मालेगाव : शिवसेनेविरोधात (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर माजी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) काल मतदारसंघात (Malegaon) परतले. मात्र यावेळी त्यांचे भेटायला येणाऱ्यांशी हाताची घडी आणि तोंडावर बोट होते. त्यांनी मोजक्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पत्रकारांना प्रवेशबंदी तर कार्यकर्त्यांना मोबाईल स्वीच ऑफ ठेवण्याच्या सूचना होत्या. `थोडं थांबा, वेळ आल्यावर सविस्तर भूमिका मांडतो` असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. (Shivsena rebel Dada Bhuse will explain his role after some period)

Dada Bhuse News, Shivsena news, Malegaon news, Eknath Shinde News
पाच कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक खुलासा

सटाणा रस्त्यावरील बालाजी लॉन्समधील बंदिस्त सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव, माजी उपसभापती सुनील देवरे, माजी उपमहापौर सखाराम घोडके, भिकन शेळके आदी व्यासपीठावर होते. या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नव्हता. कार्यकर्त्यांनी मोबाईल फोन बंद ठेवले होते.(Dada Bhuse Latest News)

Dada Bhuse News, Shivsena news, Malegaon news, Eknath Shinde News
'मातोश्री'वर जाणारा लोंढा रोखण्यासाठी श्रीकांत शिंदेही मैदानात उतरले!

या बैठकीत श्री. भुसे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेच. शिवसेनेने मला भरभरून खूप काही दिले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मैत्री व सलोख्याचे संबंध आहेत. आम्ही आजही शिवसैनिकच आहोत, यापुढेही राहू. कार्यकर्त्यांच्या स्वत: भेटीगाठी घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगू. आम्ही अखेरपर्यंत सलोख्याचे प्रयत्न करीत होतो. अपघाताने काही घटना घडत गेल्या. त्यातून मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी हा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणाले, की शिवसेना आमच्या रक्तात आहे. काही घटना, घडामोडी झाल्या. सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा होती. आम्हाला कुठलेही प्रलोभन नव्हते. तालुक्यातील बहुमोल अशी अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहेत. ती मार्गी लागण्यासाठी व मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत असलेल्या मैत्रीतूनच शहर व तालुकावासीयांसाठी हा निर्णय घेतला. अतिशय द्विधा मनःस्थिती होती. राज्यात मोठे नाव असलेले अनेक नेते या उठावात सहभागी झाले. या काळात सुनील देवरे व युवासेनेचे विनोद वाघ यांनी आपले मनोबल वाढविले, असे सांगतानाच श्री. भुसे यांनी कार्यकर्त्यांना घटनाक्रम सांगितला. आगामी काळात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊ. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगू. तूर्त थांबा, वाट पाहा, लवकरच सर्व सुरळीत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सलोख्याचे प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह असंख्य मातब्बर सुरत येथे गेल्यानंतर आम्ही मोजके १८ ते २० आमदार होतो. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो. तेथे बहुसंख्य आमदार उपस्थित होते. असे काही व्हायला नको होते. असा सर्वच जण प्रयत्न करीत होते. आम्ही काही जणांनी अखेरपर्यंत सलोख्यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी झाले नाहीत. पंधरा दिवसांनंतर तुमच्याशी पुन्हा हितगूज करेन. सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा आहे.

मेळाव्यास महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, छाया शेवाळे, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर, विनोद वाघ, सुरेश पवार, शशिकांत निकम, राजेंद्र पवार, भरत देवरे, डॉ. जतीन कापडणीस, प्रमोद निकम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com