Balasaheb Thorat, Congress leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आजचा शेतकरी हजारो तोंडाच्या रावणासोबत लढत आहे

घोटी येथील खरेदी-विक्री संघाच्या नूतन इमारतीच्या उद्‍घाटप्रसंगी शेतकरी मेळावा झाला.

Sampat Devgire

घोटी : सरकार कोणतेही येवो शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवू शकत नाही. आपल्यापेक्षा भगवान राम सुखी होते, त्यांना दहा तोंडाच्या एकाच रावणासोबत लढावे लागले. मात्र शेतकऱ्यांना हजारो तोंडाच्या रावणासोबत लढावे लागत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

घोटी येथील खरेदी-विक्री संघाच्या नूतन इमारतीच्या उद्‍घाटप्रसंगी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्याला सातत्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ आणि त्यातूनही पिके आली तर बाजारभाव कोसळणार, मग शेतकरी जगणार कसा, तुकडाबंदीची चर्चा विरोधकांनी सुरू केली, हा कायदा आजचा नाही जुनाच आहे. मात्र यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने बैठका घेतल्या जात असून, यावर लवकरच तोडगा सरकार काढेल.

श्री. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच महापालिका, नगर परिषद शहराच्या बाबतीत विचार केला जाईल. इगतपुरी तालुक्याचे पाणी शहापूरकडे न वळवता त्याचा संपूर्ण फायदा इगतपुरी तालुक्यासह नगर, मराठवाड्याला होईल, यासाठी तालुक्याचा विश्वासघात होऊ देणार नाही.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार शिवराम झोले, अनिल कदम, काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, भाऊसाहेब खातळे आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT