`राज्यात आघाडी सरकार जावं असे साकडे मी देवाला घालत नाही`

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चांदवडचे कुलदैवत रेणुकादेवीचे दर्शन घेतले.
BJP leader Pankja Munde & Jaykumar Rawal at Chandwad temple
BJP leader Pankja Munde & Jaykumar Rawal at Chandwad templeSarkarnama
Published on
Updated on

भाऊसाहेब गोसावी

चांदवड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडावे. (Mahavikas Government shall fall) भाजपचे सरकार यावे, (BJP Government shall came in ti existance) असे साकडे मी देवाजवळ घालत नाही. तशी ती घालायची देखील नसतात, भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे (Pankja Munde) म्हणाल्या.

BJP leader Pankja Munde & Jaykumar Rawal at Chandwad temple
भाजपचे खासदार आमच्यावर टीका करतात, त्यांनी एक मुतारी तरी बांधली का?

नाशिकच्या दौऱ्यावर असताना भाजप नेत्या मुंडे कुलदैवत असलेल्या चांदवडच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी चांदवडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी वंचित, गरिब आणि महिलांच्या प्रश्नांसाठी लढाण्याचे बळ मिळा असे साकडे रेणुका देवीला घातल्याचे सांगितले.

यावेळी त्या म्हणाल्या, मी युवा मोर्चाची अध्यक्ष असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने (कै.)मुंडे साहेबांसोबत चांदवडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले होते. माझ्या कार्यक्रमासाठी मुंडे साहेब प्रमुख अतिथी म्हणून आले होते. चांदवडची रेणुका देवी आमचे कुलदैवत आहे. मुंडे साहेबांच्या निधनानंतर गेली सात वर्षे दर्शनाला येणे झाले नाही. दौऱ्याच्या निमित्ताने आज हा योग जुळून आला. महिलांसाठी, गोरगरिबांसाठी व वंचितांसाठी जी लढाई मुंडे साहेबांनी सुरू केली होती, ती लढाई लढण्यासाठी मला बळ मिळो, शेवटच्या श्वासापर्यंत मला त्यासाठी योगदान देता यावं अशी प्रार्थना देवीकडे केली.

BJP leader Pankja Munde & Jaykumar Rawal at Chandwad temple
शिस्तीच्या भाजपाला बेशिस्तपणाचे ग्रहण; मंचावरील गर्दीने "पंकजाताई" भडकल्या!

यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावं व भाजपचे सरकार यावे असे साकडे घातले का? असा प्रश्न केला. त्यावर त्या म्हणाल्या, ’असे साकडे मी देवाला घालत नाही. या गोष्टी देवाला सांगायच्या नसतात, त्या आपण कमवायच्या असतात.

त्या पुढे म्हणाल्या, माध्यमांनी जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले पाहिजे. वाढत्या महागाई वर बोलताना त्या म्हणाल्या की, सरकारला काही निर्णय राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या चढ उतारानुसार घ्यावे लागतात. यामुळे थोडासा त्रास जनतेला होत असेल तर तो भरून काढण्याची क्षमता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे आहे.

अहिल्यादेवी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुभाष पवार व अशोक व्यवहारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावळ, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, सचिन दराडे, मनोज शिंदे, प्रशांत ठाकरे, वाल्मिक वानखेडे, महेश खंदारे, निलेश काळे, विशाल ललवाणी, नितीन फंगाळ आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com